मुंबई : देशभरात मधुमेह रुग्णाची संख्या सातत्याने वाढते आहे. जागतिक स्तरावर मधुमेह रुग्णांची संख्या ४०.५६ कोटी आहे. तसेच टाईप २ च्या रुग्णांची संख्या ५१ कोटींपर्यंत पोहचली आहे. मधुमेहाच्या टाईप २ रुग्णांला इन्सुलिनची मदत घ्यावी लागते. या रुग्णांची संख्या जास्त वाढ झाल्याने कमी लोकांना इन्सुलिन उपलब्ध होईल. दुसरी बाब म्हणजे इन्सुलिन इंजेक्शनची मागणी वाढल्याने त्यांच्या किंमतीतही वाढ होईल, असे मधुमेहतज्ज्ञ डॉ. एल. के. शंखधर म्हणाले. 


 


कसा होतो मधूमेह टाइप २ 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


सर्वाधिक रुग्ण टाइप २ मधुमेहाने त्रस्त आहेत. जास्त वजन वाढल्याने हा रोग होतो. या आधी मधुमेहाचा प्रसार प्रौढ वर्गातील लोकांमध्ये जास्त असायचा. पण आता मधुमेह लहान मुलांमध्येदेखील पाहायला मिळतो. डॅा. शंखधर यांच्या माहितीनुसार २०३० पर्यंत इन्सुलिनच्या उत्पादनामध्ये २० टक्क्यांनी वाढ करण्याचे कंपन्यांनी ठरविले आहे.


इन्सुलिनचा बाजार



बाजारात इन्सुलिनच्या इंजेक्शनची किंमत कधीही कमी झाली नाही. डॉक्टरांच्या मते, बाजारात तीन बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत. त्यामध्ये नोवो नॉर्डिक, इली लिली आणि सनोफी या कंपन्यांचा समावेश होतो. या तीन कंपन्यांचा बाजारात ९६ टक्के हिस्सा आहे. 


 


इन्सुलिनचा उपयोग



मधुमेहतज्ज्ञ डॅा. एल के शंखधर म्हणाले, मधुमेह रुग्णांना इन्सुलिन घ्यावे लागते. जर रुग्णाने मधुमेहावर वेळेवर नियंत्रण न मिळवल्यास रुग्णांना ह्रदय, किडणी, डोळे याच्याशी संबंधित आजार होऊ शकतात.