Diabetes राहील कंट्रोलमध्ये, फक्त `या` गोष्टी करा, कधीच वाढणार नाही रक्तातील साखर
Diabetes Yoga : मधुमेहावर (Diabetes) नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा हा आजार मूत्रपिंड आणि शरीराच्या सर्व नसा खराब करतो. जर तुम्ही अधोमुख श्वानासन हे आसन केलातर रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते. असे अनेक योगासने आहेत ज्यामुळे तुमचा मधुमेह नियंत्रणात राहिल.
Diabetes Yoga : आज बहुतेक लोक मधुमेहाने त्रस्त आहेत. मधुमेहावर उपचार न केल्यामुळे रक्तातील साखर वाढते आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. तसेच यामुळे अनेक आजार उद्भवतात. मधुमेहाचे तीन प्रकार आहेत. प्रकार 1, प्रकार 2 आणि गर्भधारणा मधुमेह. मधुमेहाने त्रस्त असलेल्यांनी आहार, व्यायाम किंवा उपचाराबरोबरच उपचाराचेही लक्ष्य ठेवले पाहिजे. योग्य आहारानेही मधुमेहावर नियंत्रण ठेवता येते. तसेच, रुग्णाने आपली जीवनशैली देखील बदलली पाहिजे. रक्तातील साखरेची पातळी वाढवणारे पदार्थ खाणे टाळणे महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला मधुमेह नियंत्रणाच ठेवायचे असेल तर या योगासना फॉलो करा.
हलासन योगा (Halasana Yoga)
हलासना या योगासनासाठी जमिनीवर पाठीच्या आधारे झोपावे लागेल. श्वास घ्या आणि वरच्या दिशेने 90 अंशात पाय वरती करा. त्यानंतर कंबर आणि हिप्सला हाताने आधार द्या. त्यानंतर पाय डोक्याच्या वरती सरळ दिशेने हलवण्याचा प्रयत्न करा. पायांचा जमिनीला स्पर्श होऊ द्या. पाय सरळ ठेवा. काही काळ याच स्थितीत राहा आणि नंतर मूळ स्थितीत परता. हे आसन तुम्ही 3 ते 5 वेळा करू शकता
सर्वांगासन (Sarvangasana Yoga)
हे आसन करताना पाठीवर झोपा. त्यानंतर, कंबर, पाय, हिप्स खांद्याच्या आधारे वर उचला. कंबरेला हाताचा आधार द्या. खांद्याच्या रुंदीवर लक्ष केंद्रित करा. खांदा आणि हातावर येत असल्याचे तुम्हाला जाणवेल. दरम्यान मान आणि डोक्यावर ताण येणार नाही याकडे लक्ष द्या. शक्य असल्यास पाय वरच्या दिशेने हलवण्याचा प्रयत्न करा. मग मूळ स्थितीतमध्ये या. तुमच्या शारीरिक क्षमतेनुसार तुम्ही या प्रकारची पुनरावृत्ती करू शकता.
वाचा : लघुशंका करताना 'या' गोष्टी अजिबात करु नका, महिलांना एक चूक पडू शकते महागात
पवनमुक्तासन (Pawanmuktasana yoga)
या आसानसाठी सुरुवातीला जमिनीवर पाठीच्या आधारे झोपा. त्यानंतर दोन्ही पाय हाताच्या मदतीने शरीराच्या दिशेने वाकवा. श्वास घ्या आणि आपला उजवा गुडघा छातीच्या दिशेने आणत श्वास सोडा. हातांनी मांड्या पोट्याच्या दिशेने आणा. त्यानंतर छाती आणि डोकं वरच्या दिशेने आणा आणि हनुवटीने उजव्या गुडघ्याला स्पर्श करा. त्यानंतर श्वास सोडा आणि मुळ स्थितीमध्ये या. त्यानंतर डावा पाय घेऊन पुन्हा वरील सांगितल्याप्रमाणे आसन करा. तुम्ही 3 ते 5 वेळा हे आसन करु शकता.
पुर्वोत्तानासन (Purvottanasana Yoga)
सगळ्यात आधी पुढच्या दिशेने पसरुन बसा. हात जमिनीवर ठेवा. यानंतर आपले हात हिप्सपासून 30 सेमी अंतरावर ठेवा. हाताचा कोपरा वाकावू नका. हाताची होडी हिप्सच्या दिशेने ठेवत शरीर उचला. पाय आणि हातांनी शरीराचा संपूर्ण भार उचलला. हे करत असताना पाठच्या दिशेने डोकं ठेवा. त्यानंतर, हळू हळू श्वास सोडत मुळ पदावर या.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)