चौथ्‍या टप्‍प्‍यातील स्‍तनाचा कर्करोग ‘मेटास्‍टॅटिक ब्रेस्‍ट कॅन्‍सर (एमबीसी)'मुळे रूग्‍ण व त्‍यांच्‍या कुटुंबांना अद्वितीय आव्‍हानांचा सामना करावा लागतो. सुरूवातीच्‍या टप्‍प्‍यातील स्‍तनाच्या कर्करोगाच्‍या तुलनेत एमबीसी हा असा कर्करोग आहे, जो स्‍तनाव्‍यतिरिक्‍त हाडे, यकृत किंवा फुफ्फुसं अशा शरीराच्‍या इतर भागांमध्‍ये पसरतो. अलिकडील काळात मेटास्‍टॅटिक ब्रेस्‍ट कॅन्‍सरबाबत अधिक प्रमाणात जागरूकतेचा प्रसार करण्‍यात आला असला तरी या कर्करोगाचे प्रमाण उच्‍च आहे. तसेच, या कर्करोगाबाबत समज व गैरसमजूतींमध्‍ये वाढ होताना देखील निदर्शनास येत आहे. या समजामुळे भितीचे वातावरण निर्माण होऊ शकते, महिला योग्‍य उपचार घेण्‍यापासून परावृत्त होऊ शकतात. योग्‍य निर्णय घेण्‍यासाठी प्रग‍त उपचारांसह उपलब्‍ध सर्व पर्यायांबाबत माहिती असणे गरजेचे आहे. खर्च होत असला तरी उपचाराचे दीर्घकालीन फायदे जीवनाचा दर्जा दीर्घकाळापर्यंत उत्तम ठेवण्‍यासाठी महत्त्वाचे आहेत. उपचाराच्‍या निष्‍पत्तींबाबत संपूर्ण माहितीसाठी आणि वैयक्तिकृत निर्णय घेण्‍यासाठी आरोग्‍यसेवा प्रदात्‍यांसोबत खुल्‍या मनाने सल्‍लामसलत करणे आवश्‍यक आहे. समजांना दूर करत आणि अचूक माहिती देत रूग्‍ण उपचाराच्‍या उत्तम निष्‍पतींचा अनुभव घेण्‍यासोबत आरोग्‍यदायी जीवन जगू शकतात.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एस. एल. रहेजा हॉस्पिटलमधील मेडिकल ऑन्‍कोलॉजिस्‍ट डॉ. शिवम शिंगला म्‍हणाले, “वर्षानुवर्षे मी निरीक्षण केले आहे की, जवळपास २० टक्‍के रूग्‍ण मेटास्‍टॅटिक ब्रेस्‍ट कॅन्‍सरच्‍या लक्षणांबाबत समज व गैरसमजांना बळी पडतात. रूग्‍ण व केअरगिव्‍हर्सनी उपचार पर्याय व निष्‍पत्तींबाबत अर्थपूर्ण संवाद साधणे, तसेच मेटास्‍टॅटिक ब्रेस्‍ट कॅन्‍सरसह जगण्‍याच्‍या गुंतागुंतींमधून नेव्हिगेट करणे महत्त्वाचे आहे. केमोथेरपीपासून प्रगत उपचार पर्यायांपर्यंत जोखीम घटक आणि मेटास्‍टॅटिक ब्रेस्‍ट कॅन्‍सरच्‍या व्‍यवस्‍थापनामधील अद्वितीय आव्‍हानांबाबत माहित असले पाहिजे. रूग्‍णांनी अचूक माहितीसह स्‍वत:ला खंबीर केले पाहिजे आणि योग्‍य उपचार योजनेची निवड केली पाहिजे, जी त्‍यांच्‍या जीवनाचा दर्जा व जीव वाचण्‍याची शक्‍यता सुधारेल.'' 


समज १: मेटास्‍टॅटिक ब्रेस्‍ट कॅन्‍सरसह निदान म्‍हणजे तुमच्‍याकडे जगण्‍यासाठी काहीच दिवस उरले आहेत. 


तथ्‍य: मेटास्‍टॅटिक ब्रेस्‍ट कॅन्‍सर पूर्णपणे बरा होत नसला तरी त्‍यावर उपचार करता येऊ शकतो. या कर्करोगासह निदान झालेले अनेक रूग्‍ण दीर्घकाळापर्यंत जगू शकतात, ज्‍यासाठी त्‍यांनी लक्ष्यित उपचार, इम्‍यूनोथेरपीज व हार्मोन थेरपीज अशा प्रगत थेरपी उपचारांचे पालन केले पाहिजे. यामागे कर्करोगावर नियंत्रण, लक्षणे कमी करणे आणि जीवनाचा दर्जा सुधारण्‍याचे ध्‍येय आहे. प्रत्‍येक रूग्‍णाचा मेटास्‍टॅटिक ब्रेस्‍ट कॅन्‍सरसंदर्भातील अनुभव वेगळा असतो आणि योग्‍य उपचार व्यवस्थापनासह अनेकजण अपेक्षेपेक्षा दीर्घकाळापर्यंत उत्तम जीवन जगू शकतात.  


समज २: रूग्‍णाने योग्‍य खबरदारी न घेतल्‍यामुळे स्‍तनाचा कर्करोग मेटास्‍टॅटिक स्‍वरूपात पुन्‍हा होऊ शकतो. 


तथ्‍य: स्‍तनाचा कर्करोग मेटास्‍टॅटिक स्‍वरूपात पुन्‍हा होण्‍यासाठी रूग्‍णाकडून कोणत्‍याही निष्‍काळजीपणाचे परिणाम नाही. रूग्‍ण त्‍यांच्‍या उपचार योजनेचे पालन करत असले तरी कर्करोगाच्‍या गुंतागुंतीच्‍या जीवशास्‍त्रामुळे कर्करोग पसरू शकतो किंवा पुन्‍हा होऊ शकतो. मेटास्‍टॅटिक स्‍तनाचा कर्करोग होण्याला प्रतिबंध करण्‍याचा कोणताही खात्रीदायी उपचार नाही. 


समज ३: मेटास्‍टॅटिक ब्रेस्‍ट कॅन्‍सरसाठी केमोथेरपी एकमेव उपचार पर्याय आहे. 


तथ्‍य: केमोथेरपी मेटास्‍टॅटिक ब्रेस्‍ट कॅन्‍सरसाठी उपलब्‍ध विविध उपचार पर्यायांपैकी एक आहे. कर्करोगाच्‍या विशिष्‍टतेनुसार लक्ष्यित थेरपी, इम्‍यूनोथेरपी व हार्मोन थेरपी असे विविध प्रगत उपचार पर्याय आहेत, जे अधिक गुणकारी ठरू शकतात. कर्करोगाचा विशिष्‍ट प्रकार व त्‍याच्‍या वर्तणूकीनुसार उपचार केला जातो आणि अनेक रूग्‍णांना कमी प्रतिकूल परिणामांसह आजाराचे व्‍यवस्‍थापन करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आलेल्‍या थेरपीजच्‍या एकत्रिकरणामधून फायदा होऊ शकतो. योग्‍य उपचार योजनेची निवड करण्‍यासाठी डॉक्‍टरांसोबत उपलब्‍ध सर्व पर्यायांबाबत सल्‍लामसलत करणे महत्त्वाचे आहे. 


समज ४: मेटास्‍टॅटिक ब्रेस्‍ट कॅन्‍सरने पीडित रूग्‍णांना सतत वेदना होत राहतील.


 तथ्‍य: मेटास्‍टॅटिक ब्रेस्‍ट कॅन्‍सर विशेषत: हाडांपर्यंत पसरत असल्‍यामुळे वेदना होऊ शकतात, पण आधुनिक उपचार व वेदना व्‍यवस्‍थापन धोरणांमुळे अस्‍वस्‍थता मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते. मेटास्‍टॅटिक ब्रेस्‍ट कॅन्‍सरने पीडित रूग्‍ण वेदना व्‍यवस्‍थापन धोरणे व उपचार योजनांसह सक्रिय, समाधानकारक जीवन जगू शकतात. 


समज ५: फक्‍त वृद्ध महिलांना मेटास्‍टॅटिक ब्रेस्‍ट कॅन्‍सर होतो. 


तथ्‍य: मेटास्‍टॅटिक ब्रेस्‍ट कॅन्‍सर तरूण महिलांसह कोणत्‍याही वयोगटातील व्‍यक्‍तींना होऊ शकतो. वय जोखीम घटक असला तरी तरूण व्‍यक्‍तींना देखील स्‍तनाचा कर्करोग होऊ शकतो. म्‍हणून वय कितीही असो सर्वांनी लक्षणे व जोखीम घटकांबाबत जागरूक असणे आवश्‍यक आहे. 


ही माहिती व्‍यक्‍तींना त्‍यांच्‍या निदानाबाबत जागरूक राहण्‍यासाठी आणि या समजांना दूर करण्‍यासाठी उपयुक्‍त आहे. आरोग्‍यसेवा प्रदाते, रूग्‍ण आणि केअरगिव्‍हर्स यांच्‍यादरम्‍यान योग्‍य सल्‍लामसलत उपचार योजना व एकूण आरोग्‍याबाबत योग्‍य निर्णय घेण्‍यासाठी महत्त्वाचे आहे. या गैरसमजूतींचे निराकरण करत मेटास्‍टॅटिक ब्रेस्‍ट कॅन्‍सरने पीडित रूग्‍णांसाठी निष्‍पत्तींमध्‍ये सुधारणा होऊ शकते.