दिवसभरात तुम्ही किती वेळा श्वास घेता? आकडा पाहून विश्वासच बसणार नाही
How Many Times You Can Breathe in 24 Hours: 24 तासांमध्ये मनुष्य किती वेळा श्वास घेतो? आकडा तुम्हाला माहितीये का?
How Many Times You Can Breathe in 24 Hours: मानवी शरीर प्रत्यक्षात एखाद्या रहस्याहून कमी नाही. किंबहुना वैज्ञानिकही याविषयी अनेक संशोधनं करत असताना वेळोवेळी थक्क होतात. मानवी शरीर आणि त्यासंदर्भातील अनेक सिद्धांत आजवर मांडण्यात आले आहेत. कैक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरंही यातून सातत्यानं पुढे आली. त्यातलाच एक प्रश्न म्हणजे माणूस दिवसातून अर्थात 24 तासांमध्ये किती वेळा श्वास घेतो.
शरीरशास्त्र आणि जीवशास्त्राच्या अभ्यातासून या प्रश्नाची उकल होते. जिथं श्वासोच्छवासाच्या प्रक्रियेशिवाय मानवाला हयात राहणंच अशक्य असतं असं सिद्ध होतं. याच प्रक्रियेतून शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो आणि यातून शरीराला आवश्कत उर्जेची निर्मितीसुद्धा होते.
श्वासोच्छवासाविषयीची 'ही' माहिती ठाऊक आहे?
एखाद्या व्यक्तीच्या श्वसनक्रियेचा वेग त्याचं वय, आरोग्य आणि शरीरयष्ठीवर आधारित असतो. सहसा एखादी सुदृढ, प्रौढ व्यक्ती मिनिटाला 12 ते 20 वेळा श्वास घेते. याचाच अर्थ 24 तासांमध्ये ही व्यक्ती 17000 ते 28800 वेळा श्वास घेते. श्वासोच्छवासाची ही आकडेवारी मोजणं अतिशय कठीण असून, वरील आकडासुद्धा सरासरीच्याच हिशोबानं घेण्यात आला आहे.
हेसुद्धा वाचा : मुंबईला आजारपणाचा विळखा; सणासुदीच्या दिवसांमध्ये कोणतं संकट घोंगावतंय?
कोणा एका व्यक्तीला कोणतीही शारीरिक समस्या असल्यास त्या व्यक्तीची श्वसनप्रक्रिया सुदृढ व्यक्तीपेक्षा वेगळी असू शकते. दैनंदिन जीवनात आरोग्याचा समतोल राखण्यासाठी व्यायाम आणि संतुलित आहारासमवेत श्वसनक्रियेमध्ये कोणताही अडथळा न येणं ही बाबही तितकीच महत्त्वाची. श्वसनाची योग्य पद्धत आणि स्वच्छ हवा कायमच शरीरातील इंद्रियांच्या कार्यक्षमतेला सकारात्मकरित्या मदत करते. यासाठी कायमच श्वसनप्रक्रियेला सर्वतोपरि प्राधान्य दिलं जातं.
श्वसनक्रियेत कोणताही व्यत्यत न येऊ देण्यासाठी ताज्या हवेत फेरफटका मारणं, प्रदूषणाच्या ठिकाणी जाणं टाळणं, जायचं झाल्यास नाका- तोंडावर मास्क लावणं या उपायांचा वापर करता येऊ शकतो.