Diet For Hair Growth: चेहऱ्याच्या सौंदर्याबरोबरच आता केसाचे सौंदर्यही तितकेच महत्त्वाचे आहे. मात्र हल्लीची व्यस्त जीवनशैली आणि प्रदूषणामुळं केस तुटणे, गळणे आणि केस दुभंगणे असे अनेक प्रकार घडतात. केसांची निगा राखण्यासाठी अनेक निरनिराळे तेल, शॅम्पू वापरले जातात. मात्र बाह्यउपचारांबरोबर शरीराला पोषण मिळणेही गरजेचे असते. इतर सर्व पेशींप्रमाणेच केसांच्या पेशींनाही पोषकतत्वाची गरज असते आणि हे पोषण आपल्या आहारातून मिळते. त्यामुळं घनदाट केसांसाठी आहारही तसा असावा. तर आज जाणून घेऊया आहार कसा असावा. 


केसांचे तीन थर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केस हे प्रामुख्याने केराटिन नावाच्या प्रथिनापासून बनवले जातात. प्रत्येक केसात तीन थर असतात. पहिला क्युटिकल हा बाह्य थर असून रंगहिन आणि संरक्षण म्हणून काम करतो. दुसरा थर का कॉर्टेक्स असून त्यात रंगद्रव्य असतात जे केसांच्या रंगासाठी जबाबदार असतात. त्याचबरोबर शेवटचा थर म्हणजे मेडूला हा सर्वात आतील थर असतो. 


केस गळणे ही प्रक्रिया समान्य असते. मात्र अतिप्रमाणात केस गळत असतील तर मात्र काळजी घेण्याची गरज असते. त्याचबरोबर केस पातळ होणे, कोंडा होणे, केस रखरखीत होणे, लवकर टक्कल पडणे अशाही समस्या निर्माण होतात. यासमस्यांवर मात करण्यासाठी तुम्हा आहारात बदल करु शकता. केसांच्या आरोग्यांसाठी खालील घटक हे फार महत्त्वाचे आहे. पण ते योग्य प्रमाणात घेणे आवश्यक आहे. 


प्रथिने 


आहारात योग्य प्रमाणात प्रथिने म्हणजेच प्रोटीन नसेल तर केस कोरडे आणि कमकुवत होतात. चिकन, मासे, दुग्धजन्य पदार्थ आणि अंडी, कडधान्य, शेंगदाणे, बदाम, काजू याचा आहारात समावेश करावा. 


ई व्हिटॅमिन


व्हिटॅमिन ई हे निरोगी केसांसाठी खूप आवश्यक असते. त्यासाठी शेंगदाणे, बदाम, वेगवेगळ्या बिया, भोपळ्याच्या, सूर्यफुलाच्या बिया याचा अहारात समावेश करा. यामुळं शरीराला जीवनसत्व ई बरोबरच झिंक आणि सेलेनियमही मिळते. 


बायोटिन


बायोटिन कमी असल्यास केस कमकुवत होऊ शकतात आणि गळूदेखील शकतात. संपूर्ण धान्य, अंड्यातील पिवळ बलक, सोयापीठ यांसारख्या पदार्थांचा समावेश आहारात केल्यास याची कमतरता भरुन काढू शकता येते. 


लोह


केसाच्या मुळांनाही रक्तपुरवठा हवा असतो. रक्तपुरवठा कमी झाल्यास केस कमकुवत होतात. लोह कमी असल्यास अशक्तपणा जाणवतो. लोहाची कमतरता भरुन काढण्यासाठी नाचणी, राजगिरा, मसूर, पालक, हिरव्या भाज्या, सॅलड याचा समावेश करा. 


ओमेगा 3


ओमेगा 3 फॅटी अॅसिड हे आपले शरीर स्वतः बनवू शकत नाहीत त्यामुळं ते आहारातून मिळवणे गरजेचे असते. ओमेगा 3 टाळू आणि केसांना हायड्रेट ठेवते. तेलकट मासे जसे सॅल्मन, हेरिंग, सार्डिम, मॅकरल, अॅवाकॅडो, भोपळ्याच्या बिया, अक्रोड, जवस यातून ओमेगा 3 मिळते.