मुंबई : Disadvantages of drinking cold drinks: सध्या उन्हाळ्याचे दिवस आहे. प्रचंड उकाडा सुरु आहे. यामुळे घशाला कोरड पडते. आपली तहान भागविण्यासाठी कोल्ड्रिंक्सला प्राधान्य दिले जाते. मात्र, हे कोल्ड्रिंक्स पिण्याचे तोटे खूप आहेत. तज्ज्ञांच्या मते, उन्हाळ्यात थंड पेय पिणे काही विशिष्ट प्रकारच्या लोकांसाठी जास्त हानिकारक ठरू शकते. त्यामुळे काही आजार वाढतात असे नाही तर ते अधिक बळावतात. त्यामुळे सावधान राहणे गरजेचे  आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उन्हाळ्यात सॉफ्ट ड्रिंक्स किंवा कोल्ड्रिंक्स पिणे बहुतेकांना आवडते. मात्र, ते प्यायल्याने तुम्हाला काही काळ ताजेतवाने वाटते, परंतु दीर्घकाळापर्यंत ते तुमच्या शरीराला हानी पोहोचवते. गुरुग्राम फोर्टिस मेमोरियल रिसर्च इन्स्टिट्यूटचे इंटरनल मेडिसिन डायरेक्टर डॉ. अमिताभ पार्टी यांच्या म्हणण्यानुसार, उन्हाळा आला असेल, तर तापमानात वाढ होते. तसेच लोकांमध्ये थंड पेयांचे सेवनही झपाट्याने वाढते. पण कोल्ड्रिंक्ससारख्या उच्च कार्बोनेटेड पेयांमध्ये साखर आणि कॅलरीज जास्त असतात. म्हणून, ते नियमितपणे पिणे किंवा जास्त प्रमाणात सेवन करणे आपल्यासाठी हानिकारक असू शकते. अशा परिस्थितीत, सामान्य लोकांसह विशिष्ट प्रकारच्या लोकांनी त्याचे सेवन टाळले पाहिजे.  


कोल्ड्रिंक्स कोणी पिऊ नये


1. मधुमेहाचे रुग्ण
मधुमेहाच्या रुग्णांनी विशेषतः थंड पेय पिणे टाळावे. याचे कारण असे की कोल्ड ड्रिंक्ससारख्या उच्च कार्बोनेटेड पेयांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांमध्ये साखर वाढते. एवढेच नाही तर त्यामुळे साखरेचा वेग वाढतो आणि मधुमेहावर नियंत्रण ठेवणे कठीण होते.


2. गॅस्ट्रोएन्टेरिटिस असलेले रुग्ण
डॉ. अमिताभ सांगतात की, लोकांना वाटते की कोल्ड ड्रिंक्समुळे अ‍ॅसिडिटी कमी होते, परंतु असे नाही, उलट ते अ‍ॅसिडिटी वाढवू शकते. पोटाची समस्या निर्माण होती. आम्लयुक्त पीएच वाढवू शकतो. याशिवाय ज्या लोकांना सतत पोटदुखी, अल्सर आणि पोटाच्या इतर प्रकारच्या समस्या असतात त्यांनी थंड पेय किंवा शीतपेय पिणे टाळावे. कारण कोल्डड्रिंक्समुळे पोटात जळजळ वाढते आणि फुगण्याची समस्या निर्माण होते.


3. उच्च रक्तदाबाचे रुग्ण
ज्यांना उच्च रक्तदाबाची तक्रार आहे त्यांनी कोल्ड्रिंक्सचे सेवन टाळावे. कारण कार्बोनेटेड ड्रिंक्समध्ये उच्च प्रमाणात सोडियम असते जे रक्तदाब वाढवण्याचे काम करते. याशिवाय, ते शरीरातील तहान कमी करून पाणी कमी होण्यास प्रोत्साहन देते, ज्यामुळे रक्तवाहिन्यांचे नुकसान होते आणि रक्तदाब वाढतो. अशा परिस्थितीत उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी कोल्ड्रिंक्सचे सेवन टाळावे.


4. हृदय विकाराचे रुग्ण
जर तुम्हाला कधी हृदयविकाराचा झटका आला असेल किंवा हृदयाशी संबंधित कोणत्याही आजारावर तुम्ही औषधोपचार करत असाल तर तुम्ही कोल्ड्रिंक्सचे सेवन टाळावे. कारण थंड पेये कोलेस्ट्रॉल वाढवण्याचे काम करतात आणि रक्ताभिसरणावर परिणाम करतात. यासोबतच हे बीपी वाढवण्याचे काम करते, त्यामुळे हृदयरोग्यांनी त्याचे सेवन टाळावे.


5. लहान मुले
आजकाल लहान मुलांमध्ये लठ्ठपणा आणि मधुमेह खूप सामान्य झाले आहेत. सॉफ्ट ड्रिंक्स आणि तेलकट पदार्थ हे त्यामागचे एक मोठे कारण आहे. अशा परिस्थितीत मुलांना कोल्ड ड्रिंक्स दिल्यास त्यांच्यामध्ये प्रीडायबेटिसचा धोका वाढतो आणि लठ्ठपणा वाढू शकतो.


याशिवाय कोल्ड्रिंक्ससारखे पेय शरीरात कॅल्शियमची कमतरता निर्माण करतात, ज्यामुळे हाडांची झीज होते. म्हणूनच उन्हाळ्यात थंड पेय पिण्याऐवजी साधे पाणी प्या आणि जास्त पाणी प्या, असे डॉ. अमिताभ सांगतात.