Postpartum Weight Loss :  लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री दिशा परमाने 17 दिवसांत केलेला वेटलॉस सध्या चर्चेचा विषय आहेय अभिनेत्री दिशा परमार आणि पती गायक राहुल वैद्य यांच्या घरी गणेश चतुर्थीच्या दिवसांमध्ये चिमुकलीचा जन्म झाला. या दोघांनी आपल्या पालकत्वाचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला. या दरम्यान दिशा परमारने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. लेकीच्या जन्मानंतर अवघ्या 17 दिवसांतच दिशाने केलेला वेटलॉस जबरदस्त आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिशा परमारने अलीकडेच तिच्या गरोदरपणानंतर वजन कमी करण्याच्या प्रवासाविषयी एक अपडेट शेअर केला आहे. तिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये दिशाने खुलासा केला आहे की तिने अवघ्या 17 दिवसांत तिचे गर्भधारणेचे वजन कमी केले आहे. काही आठवड्यांपूर्वी अभिनेत्रीने वर्कआउट करतानाचा एक फोटोही शेअर केला होता.


या फोटोनंतर गर्भधारणेनंतर इतक्या लगेच वजन कमी करणे कसे शक्य आहे? यासारख्या विषयांवर चर्चा होऊ लागली. अशावेळी डिलिवरीनंतर वजन कमी करण्यासाठी कोणत्या 5 गोष्टी फॉलो केल्या तर लवकर वजन घटवने सोपे होऊ शकते. WebMD ने दिलेल्या रिपोर्टनुसार करा फॉलो.


डाएटमध्ये काय फॉलो कराल 


तुमच्या ताटात जे काही अन्न असेल ते पूर्णपणे खा आणि कमी प्रमाणात खा. तुम्ही दिवसातून पाच ते सहा वेळा कमी प्रमाणात अन्न खाऊ शकता. फक्त ताजी फळे आणि भाज्यांचे सेवन करा कारण ते तुमच्या आरोग्यासाठी चांगले आहेत. तुमच्या आहारात होल ग्रेन ब्रेड आणि ब्राऊन राईसचा समावेश करा. जास्त साखर असलेल्या ज्यूसपासून दूर राहा आणि तुमच्या आहारात मांस, चिकन, अंडी, दही आणि दूध यासारख्या प्रथिनेयुक्त पदार्थांचा समावेश करा.


क्रॅश डाएट टाळा


प्रसूतीदरम्यान महिलांना होणारा त्रास आणि थकवा यातून बरे होण्यासाठी थोडा वेळ लागतो. हा थकवा मूल 2 किंवा 3 महिन्यांचे होईपर्यंत टिकतो. यावेळी महिलांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेऊन आपले वजन आणि कॅलरीजचे प्रमाण यावर लक्ष ठेवावे.
स्तनपान देणाऱ्या महिलांनी क्रॅश डाएट सुरू केल्यास त्याचा आईच्या दुधावर वाईट परिणाम होतो ज्यामुळे बाळाला पुरेसे दूध मिळत नाही आणि तुम्हाला माहिती आहे की आईचे दूध हेच बाळाच्या पोषणाचा एकमेव स्रोत आहे. 


प्रसूतीनंतर हळूहळू व्यायाम सुरू करा


प्रसूतीनंतर, शरीर खूप कमकुवत होते. अशावेळी जुने रुटीन फॉलो करण्यासाठी थोडा वेळ लागतो. याकरिता आपण एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. जर तुमची सामान्य प्रसूती झाली असेल तर तुम्ही 20 दिवसांनंतर काही काम सुरू करू शकता, परंतु सिझेरियन प्रसूतीच्या बाबतीत थोडी वाट बघावी लागेल.


पाणी पिणे महत्वाचे


पाणी शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे. त्वचेची काळजी, वजन कमी करण्यासाठी आणि मुलाच्या योग्य विकासासाठी जास्त पाणी पिणे खूप चांगले मानले जाते. स्तनपान करणाऱ्या महिलांनी दररोज किमान 3 लिटर पाणी प्यावे कारण स्तनामध्ये तयार होणारे दूध 50% पाणी असते.


स्तनपान


असे म्हटले जाते की आई आणि बाळ दोघांच्याही आरोग्यासाठी स्तनपान फायदेशीर आहे. हे महिलांना वजन कमी करण्यास देखील मदत करते कारण ते दररोज 850 कॅलरीज कमी करते परंतु स्तनपान केल्याने कधीकधी वजन वाढते. कारण स्तनपानानंतर तुम्हाला भूक लागते आणि जास्त अन्न खाता येते. जर तुम्ही तुमच्या आहारात पौष्टिक गोष्टींचा समावेश करून जास्त खाण्यापासून दूर राहिलात, तर स्तनपान वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते.


(फोटो सौजन्य - Disha Parmar Instagram)