मुंबई : दिवाळी हा सण आनंदाचा, रंगांचा आणि गोडाधोडाचा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोडाच्या पदार्थांशिवाय दिवाळी अपूर्णच आहे. जेवणात आणि फराळामध्ये गोड पदार्थ हमखास येतो. पण आरोग्याचा विचार करता गोडावर ताव मारण्याआधी या टीप्स नक्की लक्षात ठेवा.


1. रिकाम्या पोटी कोणत्याही गोडाच्या पदार्थावर ताव मारू नका. प्रामुख्याने लहान मुलं दिवसाची सुरूवात गोडाच्या पदार्थाने करतात. परिणामी लहान मुलांमध्ये जंतांचा त्रास होतो. 


2. जेवणानंतर गोडाचे पदार्थ खाणं टाळा. यामुळे लठ्ठपणाची समस्या वाढण्यास मदत होते. तसेच दिवसभरातील आवश्यक कॅलरीजपेक्षा त्याचे प्रमाण वाढते. 


3. रात्री झोपायला जाण्यापूर्वी गोडावर ताव मारू नका. यामुळे कॅलरी वाढण्यासोबतच रात्रीच्या वेळेस रक्तातील साखरेचे प्रमाणही वाढू शकते. 


4. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ दिवसभरापेक्षा अधिक वेळ फ्रिजमध्ये ठेवू नका. दुधापासून बनवलेली मिठाई खराब होऊ शकते. त्यामुळे काही इंफेक्शन होण्याचा धोका वाढतो. 


5. जेवणादरम्यान मिठाई खाणं अधिक फायदेशीर आहे. यामुळे अचानक ब्लड शुगर खालावण्याची शक्यता कमी होते. तसेच तात्काळ एनर्जी मिळते.