मुंबई: आपली तंदुरूस्ती कायम ठेवण्यासाठी अनेक लोक जिम, जॉगिंग आणि योगा करतात. सुदृढ आरोग्यासाठी योगा अत्यंत महत्त्वाचा आहे. पण, ही एक शारीरिक आणि मानसिकही प्रक्रिया असल्याने योगा करताना काही गोष्टी नेहमी ध्यानात ठेवाव्या लागतात. या गोष्टी म्हणजे कोणत्याही प्रकारचा योगा करताना वार्मअप करणे अत्यंत महत्त्वाचे असते. कारण, तुम्ही जेव्हा कोणत्याही प्रकारचा व्यायाम करत असता तेव्हा, तुमचे शरीर त्या व्यायामासाठी तयार असायला हवे. म्हणूनच योगा करण्यापूर्वी पूढील स्टेप्स तुम्हाला फायदेशीर ठरू शकतील.


  • COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    हात आणि मनगटाला व्यायाम द्या

  • हाताच्या मुठी वळून तर कधी पंजा रिकामासोडून तो योग्य दिशेने वळवा. 

  • दोन्ही पायांवर रळ उभे राहा. नंतर एका पायावर उभे राहून वर उचललेल्या पायाचा चंपा गोलगोल फिरवा. 

  • गुडघे, कंबर, खांदे यांना योग्य त्या प्रमाणात फिरवून व्यायाम द्या.

  • दीर्घ श्वास आत घ्या आणि हळूहळू बाहेर सोडा. जेणेकरून हृदय पू्र्ण क्षमतेने काम करेन.

  • पोटालाही योग्य तो व्यायाम द्या

  • वरीर सर्व कृती केल्यावरच तुम्हाला हवा तो व्यायाम किंवा योगा करण्यास सुरूवात करा