मुंबई : पावसाळ्यात विविध प्रकारच्या इंफेक्शनचा धोका वाढतो. पदार्थांचे सेवन करताना विशेष काळजी न घेतल्यास आजार, इंफेक्शन होण्याची संभावना बळावते. त्यामुळे पावसाळ्याच्या हंगामात फळे खाण्यापूर्वी या गोष्टींची अवश्य खबरदारी घ्या.


फळे खाण्यापूर्वी स्वच्छ धुवा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही लोक फळे न धुता खातात. त्यामुळे इंफेक्शन, आजार होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे फळे धुवूनच खावीत.


कलिंगड, टरबूज यांसारखी फळे टाळावीत


पावसाळ्यात वातावरणात दमटपणा असतो. त्यामुळे कलिंगड-टरबूज यांसारख्या फळांना बॅक्टेरियाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. ही फळे आतून खराब म्हणजेच इंफेक्टेड असतात. त्यामुळे ती टाळणेच योग्य ठरेल.


हंगामी फळे खा


हंगामानुसार फळे खाणे आरोग्यास फायदेशीर ठरते. 


फळांची खरेदी काळजीपू्र्वक करा


पावसाळ्यात फळे खरेदी करताना विशेष काळजी घ्यावी लागते. कापून ठेवलेली फळे खरेदी करु नका. कारण त्यात बॅक्टेरिया, किटाणूंचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यामुळे ताजी, स्वच्छ, फ्रेश फळे काळजीपू्र्वक निवडा.


अशा फळांचे सेवन टाळा


खूप वेळ कापून ठेवलेल्या फळांचे सेवन करु नका. फळे कापून उघड्यावर ठेवण्याऐवजी फ्रिजमध्ये ठेवा. त्याचबरोबर कापून खूप वेळ फ्रिजमध्ये ठेवलेली फळे खाणे देखील टाळा. 


ज्यूस


अधिकतर लोक घरात फळांचे ज्यूस न बनवता रस्त्यावरील गाड्यांवर त्याचा आस्वाद घेतात. पण पावसाळ्यात असे करणे टाळा. कारण गाड्यांवरील अस्वच्छता, पाणी यामुळे इंफेक्शनचा धोका वाढतो.