पायांत गोळे येतात? करा `हे` घरगुती उपाय
शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे पायांमध्ये गोळे येतात.
मुंबई : अनेकदा रात्री झोपेत पायांना गोळे येतात. त्यामुळे पायांना तिव्र वेदना होतात आणि वेदना असह्य होतात. शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे पायांमध्ये गोळे येतात. हायपोथॉयराईड रुग्णांना वारंवार पायात गोळे येण्याचा त्रास होऊ शकतो. थकवा, अशक्तपणा ही यामागील महत्वाची कारण असतात. अतिरिक्त व्यायाम केल्याने सुद्धा पायांमध्ये गोळे येण्याची शक्यता असते. शरीरात पोषक तत्वांची कमतरता असेल तर पायात गोळे येण्याचा त्रास संभवतो. विशेषतः पोटॅशियम सोडियम आदी आवश्यक खनिजांची मात्रा कमी असेल तर रात्री पायात क्रॉम्प येऊ शकतात.
पायांना गोळे न येण्यासाठी घरगुती उपाय
- शेवग्याच्या शेंगांची भाजी, उकडलेल्या अंडय़ाचा पांढरा भाग, डिंकाचे लाडू, कोबी असे कॅल्शियमयुक्त पदार्थ खावेत.
- रोज एक केळे खावे. भरपूर पाणी प्यावे. रोज पहाटे अनाशेपोटी दोन आवळे खावेत. पायात गोळे येण्यावर हा रामबाण उपाय आहे.
- संत्र्याचा रस आणि केळी हा पोटॅशियमचा सर्वात मोठा स्रेत आहे.
- नियमीत पाय लांबवणे, पायाला तेलाचा मसाज देणे लाभदायक ठरते.