मुंबई : उन्हाळ्यात लोकांना थंड पेय किंवा कोल्ड ड्रिंक प्यायला आवडते. कडकडीत उन्हात जेव्हा आपल्याला असह्य होतं तेव्हा आपण दुकानातून थंड पाण्याची बाटली विकत घोतो किंवा कोल्ड ड्रिंक पितो, ज्यामुळे खूप बरं वाटतं. परंतु बरेच लोक याच्या बाटल्या फेकू न देता त्याचा पुन्हा पाणी ठेवण्यासाठी वापर करतात. लोकांचा असा समज असतो की, वेगळ्या बाटल्या विकत घेण्यापेक्षा आपण या प्लास्टीकच्या बाटल्यांचा वापर करुयात,म्हणून मग आपण ते घरी वापरण्यासाठी ठेवतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बऱ्याच घरांमध्ये कोल्ड ड्रिंकच्या किंवा पाण्याच्या अशा बाटल्या पाण्यासाठी वापरल्या जातात. तुमच्या घरात देखील तुम्ही अशी बाटली वापर असला. परंतु तुम्हाला माहितीय का की असं करणं किती हानिकारक आहे? आणि ही बाटली तुमचं किती नुकसान करतेय?


या बाटल्या दीर्घकाळ वापरल्या जातात तेव्हा त्यामध्ये फ्लोराईड आणि आर्सेनिकसारखे घटक तयार होतात आणि ते शरीरासाठी अत्यंत हानिकारक असतात. असे म्हटले जाते की ते शरीरात स्लो पॉयझनचे काम करतात.


त्यामुळे कोल्ड ड्रिंक किंवा पाणी पिऊन झाल्यानंतर त्याच्या बाटल्यांचा पुन्हा वापर करु नये, त्या फेकून द्याव्यात किंवा त्याचा पाणी भरण्या व्यतिरिक्त दुसऱ्या गोष्टींसाठी उपयोग करावा.


प्लास्टिकच्या बाटलीत ठेवलेल्या पाण्याचा तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होत असल्याचे अनेक अहवालांमध्ये समोर आले आहे. त्यातून निर्माण होणाऱ्या रसायनांचा तुमच्या शरीरावर खोलवर परिणाम होतो. प्लॅस्टिकमध्ये phthalates सारखे रसायन असल्यामुळे यकृताच्या कर्करोगाचा धोकाही वाढतो.


या बाटल्यांमध्ये जास्त वेळ पाणी ठेवल्याने BPA म्हणजेच Biphenyl A तयार होते. हे एक प्रकारचे रसायन आहे, ज्यामुळे तुमच्या शरीरात लठ्ठपणा, मधुमेह इत्यादी आजार होतात.


याशिवाय जेव्हा या बाटल्यांमध्ये ठेवलेले पाणी गरम होते किंवा सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येते तेव्हा त्यातून विषारी पदार्थ तयार होतात, ज्यामुळे अनेकांना कर्करोगही होतो.