मुंबई : कधी-कधी आपल्या डोळ्यासमोर अशा राही गोष्टी असतात. त्याचं कारणच आपल्याला माहित नसतं. आपण दररोज एखादी वस्तू पाहत असतो. पण त्या वस्तूबाबतचं कोडं आपल्याला लवकर सापडत नाही. अशीच एक गोष्ट आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपण अनेकदा डॉक्टरांनी गोळ्या लिहून दिल्यानंतर त्या मेडिकलमध्ये जावून घेऊन येतो. अनेक गोळ्यांच्या पाकिटात एकच गोळी असते. पण तरी देखील त्यासाठी मोठं पाकिट असतं. गोळी जरी एकच असली तर त्याच्या बाजुला काही रिकाम्या जागा असतात. पण त्यात गोळ्या नसतात.


गोळ्यांच्या पाकिटात असताना त्या तुटू नयेत म्हणून त्याच्या आजुबाजुला रिकाम्या जागा असतात. हे देखील एक कारण आहे. 


औषधांची पाकिटं मेडिकलला पोहोचत असतांना कोणतंही नुकसान होऊ नये म्हणून ही जागा असते. औषधांसाठी Cushioning Effect सारखे असतात. ज्यामुळे औषधांचं नुकसान होत नाही.


दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे, गोळी बद्दल संपूर्ण माहिती छापण्यासाठी ही स्पेस वाढवलेली असते.