मुंबई : सध्या काळात बहुतेक आजारांचं मुख्य कारण हे लठ्ठपणा आहे. कॅन्सर, मधुमेह, स्ट्रोक किंवा हृदयविकारांसारखे आजारांचं कारण लठ्ठपणा आहे. लठ्ठपणा कमी करण्यासाठी लोकांना केवळ मेहनतच नाही तर आहारातही अनेक बदल करावे लागतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, लठ्ठपणा किंवा पोटाची चरबी वाढण्यामागे आपल्या दररोजच्या काही सवयी कारणीभूत आहेत. ज्या सवयींमध्ये बदल केल्यास लठ्ठपणाचा त्रास दूर होऊ शकतो.


उभं राहून पाणी पिणं


आजकाल बहुतेक घरांमध्ये उभं राहून बाटलीतून पाणी पितात. याचं कारण वेळ नसणं. मात्र यामुळे पोटाची चरबी तर वाढतेच पण पोट फुगण्याच्या समस्येचं देखील हे कारण बनतं. मानवी शरीर अशा प्रकारे बनवलं आहे की, बसून पाणी प्यायलं तरच त्याचे सर्वाधिक फायदे मिळू शकतात. 


जेवण टाळणं


सामान्यतः लोक वजन कमी करण्यासाठी बरेच दिवस जेवण टाळतात. मात्र त्यामुळे मेटाबॉलिझम मंदावतो. चयापचय क्रिया मंदावल्यास कॅलरी बर्न करण्याची क्षमता कमी होते. यामुळे वजन वाढू शकतं. त्यामुळे जर तुम्ही असे करत असाल तर ते करू नका, कारण यामुळे तुमच्या पोटाची चरबी झपाट्याने वाढू शकते.


साखरयुक्त पेयं पिणं


बहुतेक लोकं जंक फूडसोबत सोडा किंवा कोल्ड्रिंक्सचे सेवन करतात. यामागील लोकांचा असा विश्वास आहे की कोल्ड्रिंक किंवा सोडा हे पदार्थ सहज पचवू शकतात. मात्र नुकत्याच केलेल्या अभ्यासात असं आढळून आलं आहे की, फक्त एक ग्लास सोडा किंवा कोल्ड ड्रिंकमध्ये 39 ग्रॅम पर्यंत साखर असते. यामुळे बेली फॅट 70 टक्क्यांपर्यंत वाढू शकतं.