नवी दिल्ली : संशोधकांचं म्हणणं आहे की, आपल्या फुफ्फसांमध्ये एक वेगळीच 'जादुई' क्षमता आहे जी धुम्रपानामुळे झालेलं नुकसान आपोआप भरुन काढू शकते. फुफ्फुसाच्या कर्करोगास जन्म देणारे म्यूटेन्शन्स तिथेच कायमस्वरूपी असल्याचं मानलं जातं आणि धूम्रपान सोडल्यानंतरही ते म्यूटेन्शन्स तिथेचं राहत असल्याचं बोललं जातं. पण 'नेचर'मध्ये छापण्यात आलेल्या संशोधनानुसार, काही पेशी फुफ्फुसाला झालेलं नुकसान ठिक करण्याचं काम करतात. धूम्रपान सोडण्याआधी ४० वर्षांपर्यंत दररोज एक पॅकेट सिगरेट पिणाऱ्या रुग्णांमध्ये हे परिणाम दिसून आले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धुम्रपान करताना तंबाखूमध्ये असणारे हजारो रसायन फुफ्फुसातील स्वस्थ पेशींच्या डीएनएला बदलून त्याचं हळू-हळू कॅन्सरमध्ये रुपांतर करतात. 


पण, ज्यावेळी कोणी धुम्रपान करणं सोडतं, त्यावेळी या पेशी वाढतात आणि फुफ्फुसाला झालेल्या नुकसानीच्या पेशीला हटवण्याचं काम करतात. 


ज्या लोकांनी धुम्रपान सोडलं आहे, त्यांच्या ४० टक्के पेशी त्याच लोकांप्रमाणे आहेत ज्यांनी कधीही धुम्रपान केलंलं नाही. सँगर इंस्टिट्यूटचे डॉक्टर पीटर कॅम्पबेल यांनी, या संशोधनात अशा काही पेशी आहेत ज्या धुम्रपानामुळे बिघडलेलं फुफ्फुसांचं स्वास्थ आणि त्यातील हवेचा थर पूर्ववत करण्यास (निरोगी) करण्यास मदतशीर ठरत असल्याचं दिसून आलं. ४० वर्षांपर्यंत धुम्रपान केल्यानंतर ज्या रुग्णांनी धुम्रपान सोडलं, त्यांच्यामध्ये मोठे बदल पाहण्यात आले. अशा रुग्णांच्या त्या पेशी पुन्हा जीवित झाल्या ज्या तंबाखूच्या संपर्कात आल्या नव्हत्या. 


संशोधकांकडून, धुम्रपानानंतर फुफ्फुस किती प्रमाणात स्वस्थ होतात याबाबत अद्याप याची पडताळणी करत आहेत.


ब्रिटनमध्ये दरवर्षी फुफ्फुसाच्या कॅन्सरची ४७ हजार प्रकरणं समोर येतात. यात जवळपास तीन चतुर्थांश प्रकरणं धुम्रपानामुळे होतात. संशोधनातून असं समोर आलं आहे की, कॅन्सरचा धोका त्याच दिवसापासून कमी होतो, ज्या दिवसापासून धुम्रपान सोडलं जातं.