मुंबई : राज्यात अखेरीस मान्सून दाखल झाला आहे. पाऊस असला तरीही नागरिकांना ऑफिसला जाणं भाग आहे. अशा परिस्थितीत कामानिमित्त घराबाहेर पडावं लागतं. दुसरी पावसाचा आनंद घेण्यासाठी लहान मुलंही खेळताना दिसतात. अशावेळी काळजी घेतली नाही तर गंभीर आजार होण्याची शक्यता असते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्वात जास्त संसर्गजन्य आजाराचं प्रमाण पावसाळ्यामध्येच दिसून येतं. पावसाळा हा अनेक आजार आपल्यासोबत घेऊन येतो. त्यामुळे या ऋतुमध्ये काळजी घेणं गरजेचं असतं. जर तुम्ही कधी पावसात भिजत असाल तर काही गोष्टींची नक्कीच काळजी घ्या.


कपडे बदला 


पावसात भिजल्यानंतर अनेकदा आपण भिजलेले कपडे बदलत नाही. मात्र असं करू नका. भिजल्यावर लगेच कपडे बदलणे. यामुळे तुम्ही फंगल इन्फेक्शन होणार नाही.


क्रिम लावा


पावसात भिजल्यावर अँटीबॅक्टेरियल क्रीम जरूर वापरा. यामुळे शरीरातील बॅक्टेरिया नष्ट होतात. या क्रीममुळे बॅक्टेरियाच्या समस्या होणार नाही.


आल्याचा चहा 


पावसात भिजल्यानंतर गरम हळदीचं दूध प्या. याला पर्याय म्हणून तुम्ही आल्याचा चहा, कॉफी प्यावा. ताप आणि सर्दी टाळण्यासाठी गरम खावं किंवा प्यावं.


पाय कोरडे करा


पावसाळ्यात बाहेरून आल्यावर पाय स्वच्छ पाण्याने चांगले धुवून. त्यानंतर पाय स्वच्छ आणि कोरडे करा. यामुळे तुम्हाला   फंगल इन्फेक्शन होणार नाही.