देशभरात उष्णतेची लाट वाढलेली असून याचा गंभीर परिणाम तुमच्या आरोग्यावर ही मोठ्या प्रमाणावर होत असतो. वाढत्या तापामानामुळे सरबत आणि आईसक्रीम सारख्या थंड पदार्थाचं सेवन जास्त केलं जातं. मात्र डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार फक्त वाढत्या ऊन्हामुळेच नाही तर चुकीच्या सवयींमुळे देखील उन्हाळ्यात आजारी पडण्याची शक्यता असते.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

थंड पदार्थांचं सेवन
उन्हाळ्यात डिहायड्रेशनचा त्रास मोठ्या प्रमाणात होत असतो, म्हणून बऱ्याचदा गर्मीत बाहेरुन आल्यानंतर थंड पाणी पिणं, आईसक्रीम आणि कोल्ड्रिंक सेवन केल्याने शरीरातील तापमानात बदल होत जातो. त्यामुळे आजारी पडण्याची शक्यता जास्त असते.

थंड पाण्याने अंघोळ करणं
घामामुळे शरीराला दुर्गंधी येते म्हणूनचं थंड पाण्याने अंघोळ करण्याला सगळेच जण पसंती देतात. मात्र उन्हातून आल्यानंतर किमान 30 मिनिटे तरी साधारण तापमान राहिल्यावर मग थंड पाण्याने अंघोळ करणं फायदेशीर ठरतं.

एसीसमोर बसणं टाळावं
गर्मामुळे एसी किंवा कुलरच्या थंड हवेमध्ये राहण्यावर अनेक जण पसंती देतात. लगेच गर्मीतून थंड हवेमध्ये आल्यानंतर शरीराला तापमान बदलासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. तापमान झपाट्याने बदलत गेल्याने  म्हणूनच सर्दी, खोकला आणि ताप येऊन आजारी पडण्याची शक्यता जास्त असते.म्हणूनच या चुकीच्या सवयींमुळे आजाराला आमंत्रण दिलं जातं.

पाणी पिणं
गरमीमुळे घसा कोरडा पडणं, तोंड सुकणं हे वारंवार होत असतं,त्यामुळे पाणी उभ्याने न पिता बसून प्यावं त्यामुळे याचा शरीराला चांगला फायदा होतो. सहसा उन्हातून आल्यानंतर फ्रीज मधलं थंड पाणी न पिता साधं पिण्याचा डॉक्चरांकडून सल्ला दिला जातो.


चमचमतीत पदार्थाचं सेवन करणं
संमारंभात किंवा बाहेर जेवायला गेल्यावर दुपारी आणि रात्रीच्या जेवणात मसालेदार आणि तळलेले पदार्थ खाण्यात येतात. गर्मीच्या दिवसात अशा चमचमीत पदार्थांच्या अतिरिक्त सेवनाने अ‍ॅसिडीटी, डोकं दुखणं आणि छातीत जळजळणं यासारख्या समस्या निर्माण होतात. खास करुन जर तुम्ही दुपारच्या जेवनात हलका आहार आहार घेतला आणि सोबतच कोशिंबीर,दही आणि सब्जाच्या पाण्याचं सेवन केल्यास तब्येत संतुलित राहण्यास मदत होते. छोट्या छोटया चुकीच्या सवयींमुळे शरीरावर गंभीर परिणाम होताता म्हणूनच उन्हाळ्याच्या दिवसात  या चुका टाळाव्यात असं डॉक्टरांकडून सांगितलं जातं.  


 


( येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)