मुंबई : अनेकवेळा वैवाहिक नात्यात दाम्पत्य नकळत अशा काही चुका करतात, ज्यामुळे त्यांचे वैवाहिक आयुष्यात अनेक अचडणी निर्माण होतात. दिवसभर फोनवर असण्याच्या नादात किंवा ऑफिसमध्ये जास्त वेळ घालवण्याच्या नादात तुम्ही तुमच्या जोडीदाराचा वाढदिवस विसरता आणि ती खूप वाईट सवय बनते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशा काही सवयी असतात ज्याकडे दुर्लक्ष करता येतं पण काहीवेळा रुपांतर भांडणात होतं. त्यानंतर नात्यात दुरावा वाढू लागतो. अशा परिस्थितीत, तुम्हाला त्या वाईट सवयी माहित असणं आवश्यक आहे, जेणेकरून तुम्ही त्या सुधारू शकता. 


न बोलता समोरच्यावर ओरडणं


भांडणाच्या वेळी काही जोडप्यांना एकमेकांवर ओरडताना तुम्ही पाहिलं असेल. जोडप्यांमधील ही एक मोठी समस्या आहे, ज्यामुळे ते त्यांच्या समस्या सोडवू शकत नाहीत. ओरडण्याऐवजी तुम्ही तुमच्या पार्टनरशी तुमच्या समस्यांबद्दल आरामात बोललं पाहिजे. एकमेकांवर ओरडून किंवा किंचाळून अनेकदा तुम्हा वाईट शब्द वापरता. त्याचबरोबर जोडीदाराच्या नजरेतही तुमची प्रतिमा फारशी चांगली होत नाही.


माझा जोडीदार माझा शत्रु


जर तुम्ही तुमच्या जोडीदाराशी भांडणाची संधी शोधत असाल तर साहजिकच तुमची मोठी समस्या आहे. तुम्हाला हे समजले पाहिजे की वैवाहिक जीवनात जोडीदारासोबत चालायचं असते, त्याच्याशी लढायचे नसतं. एकमेकांना निराश करणं तुमच्या नात्याचा पाया खराब करू शकतं. 


फायनेंशियल सिक्रेट्स ठेवणं


आर्थिक गुंतवणूक तुमच्या जोडीदारापासून लपवून ठेवल्याने तुमच्या दोघांमधील गैरसमज आणि भांडणं वाढू शकतात. पैसे खर्च करण्याच्या गोष्टींवर तुमच्या जोडीदाराचा आक्षेप असू शकतो. पण याचा अर्थ असा नाही की, तुम्ही तुमच्या बचत योजना त्यांच्यापासून लपवून ठेवाव्यात. त्यामुळे तुम्ही काहीही आर्थिक नियोजन कराल ते जोडीदाराला सोबत ठेवून करा. 


तिसऱ्या व्यक्तीचं मत घेणं


तुमच्या वैवाहिक जीवनात काही अडचणी आल्या तर बाहेरच्या लोकांसोबत चर्चा करू नका. सासू-सासरे अनेकदा पती-पत्नीच्या गोष्टींमध्ये सल्ला देतात. मात्र अशाने आणखी नुकसान होण्याची शक्यता असते. तुमची समस्या कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीकडे नेऊ नका, त्याऐवजी तुम्ही एकजुटीने तुमचे प्रश्न सोडवा.