सतत तोंड येतंय? मग हे पदार्थ अजिबात खाऊ नका!
तोंड येण्याचा त्रास असलेल्या व्यक्तींनी काही पदार्थांचं सेवन करणं टाळलं पाहिजे.
मुंबई : Mouth Ulcer म्हणजेच सामान्य भाषेत तोंड येण्याची समस्या. तोंड येण्याच्या समस्येत व्यक्तीला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. यावेळी काहीही खाताना किंवा पिताना व्यक्तीला प्रचंड वेदना होतात. अनेकजण तोंड आलं की विविध उपचार करतात. मात्र तुम्हाला माहितीये का ज्या व्यक्तींना हा त्रास असतो त्यांनी काही पदार्थांचं सेवन करणं टाळलं पाहिजे.
तंबाखू
निरोगी आरोग्यासाठी तंबाखू आणि खैनी यांसारख्या पदार्थांचं सेवन करू नये. परंतु ज्या व्यक्तींना तोंड येण्याची समस्या असते त्यांनी यापासून दूर रहावं. तंबाखू खाल्ल्याने जखमेला अजून त्रास होतो.
टोमॅटो
तोंड येण्याचा त्रास असलेल्या व्यक्तींनी टोमॅटो किंवा इतर लिंबूवर्गीय फळांचं सेवन करणं टाळलं पाहिजे. कारण आंबट पदार्थांमुळे जखम वाढण्याची शक्यता असते.
मसालेदार पदार्थ
हा त्रास असलेल्या व्यक्तींनी तिखट आणि मसालेदार पदार्थांचं सेवन करणं टाळावं. यामध्ये तिखट भाज्या, वेफर्स, आंबट पदार्थ तसंच जंक फूडचं सेवन करू नये. हे पदार्थ खाल्ल्याने जखमेची अधिक जळजळ होण्याची शक्यता असते.
टोस्ट
अशा परिस्थिचीच सुके पदार्थ खाणं टाळावं. असे पदार्थ खाताना जखम अजून वाढण्यासाठी शक्यता असते. परिणामी यामुळे जळजळही होऊ शकते.