Benefits of Fruit Peels: आपल्या सर्वाना माहित आहेच कि फळ खान आपल्या आरोग्यासाठी किती फायद्याचं जर योग्य प्रमाणात आपण फळ खाल्ली तर त्यामुळे आपण कितीतरी आजारांना होण्यापासून रोखू शकतो . पण बऱ्याचदा काही लोक फळ चुकीच्या पद्धतीने खाल्ली जातात ज्यामुळे आपली आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो .एक सर्वसामान्य प्रश्न बऱ्याचदा विचारला जातो तो म्हणजे  फळांची साल काढून फळं खाल्ली पाहिजेत कि साल न काढता ?चला तर जाणून घेऊयात काय आहे फळं खाण्याची योग्य पद्धत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सालीसकट कि सालीशिवाय 
बऱ्याचदा हे कन्फ्युजन असत की  फळं सालीसकट खावीत कि सालीशिवाय तर एक्सपर्टस्च्या म्हणण्यानुसार प्रत्येक फळाची नेचर कि वेगवेगळी असते त्यामुळे काही फळांची साल न काढता ते खाण गरजेचं असत.तर काही फळं साल काढून खावीत. 


सफरचंद कसं खावं ?
आपल्यापैकी बरेच लोक सफरचंद कसे खाता ? काहीजण सफरचंदाची साल काढून ते खातात मात्र हे करणं चुकीचं आहे ,कारण सफरचंदाच्या सालीमध्ये फायबर असतं ते काढल्याने सफरचंदाचे पूर्ण पोषण तुम्हाला मिळत नाही. 


संत्र कसं खावं 
ही सर्व सामान्यगोष्ट आहे कि संत्र्याची साल काढून खाल्लं जात पण काहीजण असे आहेत जे संत्र्यावरची एक पातळ साल असते ती सुद्धा काढून खातात मात्र असं करू नये अशाने  संत्र्यातील सर्व पोषक तत्व तुमच्या पोटात जाणार नाहीत. 


केळ 
बारमाही मिळणारं हे फळ सर्वांगाने परिपूर्ण असं आहे .केळ्याच्या सालींमधे बरेच पोषक तत्व असतात विटामिन बी 6, विटामिन बी 12, पोटेशियम कार्बोहाइड्रेट  इतके सगळे गुणधर्म असतात मात्र तरीही केळ्याची साल काढून ते खाल्लं जातं पण या सालीचा तुम्ही इतर उपयोग करू शकता.