मुंबई : फिट राहण्यासाठी लोक अनेक व्यायाम करतात आणि जिममध्ये जातात. बरेच लोक मॉर्निंग वॉक करतात, तर काही लोक रूटीन रनिंग करतात. धावणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे. कारण धावल्याने तुमचे आरोग्य चांगलं राहतं. तुम्ही एका दिवसात किती धावायचं हे तुमच्यावर अवलंबून आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रनिंग करण्याचा एक सर्वात मोठा फायदा म्हणजे तुमची रोगप्रतिकारक शक्ती चांगल्या प्रकारे कार्य करते, ज्यामुळे तुमचे अनेक रोगांपासून संरक्षण होतं. पण धावताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात हे तुम्हाला माहीत आहे का? सकाळच्या वेळी धावताना काही गोष्टींवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे.


रनिंग करण्यापूर्वी काहीतरी खा


लोक सकाळी उठतात आणि फ्रेश झाल्यावर रनिंग करण्यासाठ निघतात. जर तुम्हीही असं करत असाल तर ही पद्धत योग्य नाही. धावण्याच्या 30 मिनिटांपूर्वी काहीतरी हलक्या पद्धतीचा आहार घेतला पाहिजे. यामुळे तुम्हाला धावण्याची ऊर्जा मिळते. म्हणून रिकाम्या पोटी कधीही धावू नका.


एकटे धावू नका


तुम्ही एकटे रनिंगला जात असाल तर तसं करणं टाळा. सकाळी तुमच्यासोबत रनिंगसाठी तुमच्या मित्रांना सोबत घेऊन जा. मित्रांसोबत धावल्याने तुमचं मनोबल वाढतं. याशिवाय जेव्हा तुम्ही रनिंग करता तेव्हा तुम्हाला प्रेरणा मिळतील अशी गाणी ऐका.


शूज घालून धावा


जर तुम्ही रोज धावत असाल तर त्यासाठी तुम्ही रनिंग शूज वापरणं आवश्यक आहे. हे शूज घातल्याने तुमच्या पायांचंही संरक्षण होते. रनिंग शूज खूप हलके असतात, ज्यामुळे तुमच्या पायावर जास्त भार पडत नाही.