मुंबई : सतत पायांमध्ये वेदना होण्याची समस्या अनेकांना जाणवते. यामध्ये अनेकदा काही जणं वयोमानानुसार हा त्रास म्हणून सोडून देतात. कदाचित तुम्हालाही हा त्रास होत असेल आणि तुम्हीही याकडे दुर्लक्ष करत असाल...मात्र जर तुम्ही याकडे दुर्लक्ष करत असाल तर असं करू नका. कारण पायांचं दुखणं हे इतर अनेक गंभीर आजारांचं दुखणं असू शकतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युनायटेड किंग्डमच्या ग्रेटर मॅनचेस्टरमध्ये राहणाऱ्या एका महिलेने तिच्या नवऱ्याच्या या गंभीर आजाराबाबत माहिती दिली. 
महिलेने दिलेल्या माहितीनुसार, तिच्या पतीचा रोज रात्री पाय दुखायचा. मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं. याचाच परिणाम गंभीर झाला आणि अखेर तो व्हिलचेअरवर खिळला. अद्यापही त्याला स्वतःच्या पायांवर उभं राहता येत नाहीये. 


59 वर्षीय ग्लेन उर्मसन असं या व्यक्तीचं नाव आहे. गेल्या वर्षी दरोरोज त्याच्या पायांमध्ये तीव्र वेदना होत होत्या. थकव्यामुळे आपल्याला हा त्रास होत असेल असा या व्यक्तीने विचार केला. यामुळे त्याने हे दुखणं जास्त गांभीर्याने घेतलं नाही. 


मात्र काही दिवसांनी जेव्हा त्याचा हा त्रास वाढला तेव्हा त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ग्लेनने सांगितलं की, 30 नोव्हेंबर रोजी जेव्हा त्याला रुग्णालयात नेण्यात आलं त्यावेळी डॉक्टरांनी त्याच्या काही तपासण्या केला. मात्र या तपासण्यांमध्ये काहीही निष्पन्न न झाल्याने त्याला घरी सोडण्यात आलं.


मात्र डिसेंबरमध्ये ख्रिसमसदरम्यान त्याला पुन्हा पायांमध्ये अशा तीव्र वेदना होऊ लागल्या. यावेळी त्याची अवस्था आणखी बिकट झाली आणि त्याला पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं.  


यावेळी ग्लेनच्या आजाराचं निदान झालं आणि त्याच्या पाठीच्या मणक्याच्या हाडात इन्फेक्शन झाल्याचं समोर आलं. यामुळेच त्यानंतर तो व्हिलचेअरला खिळला. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ग्लेनच्या पत्नीने नवऱ्याच्या या आजाराबात सोशल मीडियावर माहिती दिलीये आणि पायांमधील वेदनांकडे दुर्लक्ष करणं किती महागात पडू शकतं याबाबत सांगितलं आहे.