मुंबई : नाती ही अत्यंत नाजूक असतात आणि प्रेमाचे नाते तर त्याहूनही नाजूक. त्यामुळेच त्याची अधिक काळजी घ्यावी लागते किंवा ते नाते अधिक प्रेमपूर्वक जपावे लागते. पण नात्यात भांडण, वाद होणे हे अगदी स्वाभाविक आहे. मात्र भांडण झाल्यावर तुम्ही ती गोष्टी कोणत्याही तरी जवळच्या व्यक्तीशी किंवा मित्र-मैत्रिणीशी शेअर करता. शेअर केल्याने तुम्हाला मोकळे वाटते, ताण हलका होतो किंवा काही वेळेस तुमच्या समस्येचे समाधान तुम्हाला मिळते. पण असे प्रत्येक वेळी होईल असे नाही. याउलट तुमचे नुकसानही होऊ शकते. त्यामुळे तुमच्या रिलेशनशिपमधील प्रत्येक गोष्टी इतरांशी शेअर करु नका. तुमचा आणि तुमच्या पार्टनरचा आत्मसन्मान जपण्यासाठी हे महत्त्वाचे आहे. पाहुया अशा कोणत्या गोष्टी आहेत...


पार्टनरच्या पर्सनल गोष्टी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पार्टनरने अत्यंत विश्वासाने सांगितलेल्या त्याच्या/तिच्या पर्सनल गोष्टी कोणाहीसोबत शेअर करु नका. रागातही कदापि असे करु नका. आयु्ष्यातील सुख-दुख वाटून घेण्यासाठी हे नाते असते. तसंच या नात्यात विश्वास महत्त्वाचा असतो. त्यामुळे नाराज किंवा रागात असल्यामुळे या विश्वासाला तडा जावू देऊ नका.


तुमच्या भांडणासंबंधित गोष्टी


प्रत्येक कपलमध्ये वाद, भांडणे होतातच. त्यामुळे त्याची सगळी माहिती आपल्या फ्रेंड्सना देऊ नका. याऐवजी तुमच्या दोघांमध्ये आलेला दूरावा दूर करण्याचा प्रयत्न करा. कारण तुम्ही दोघे भांडणे विसरुन जाल पण तुमचे फ्रेंड्स हे कायम लक्षात ठेवतील.


पार्टनरच्या पूर्वीच्या रिलेशनशीपबद्दल


कधी तणावात तर कधी रागात तुम्ही मनातले सर्व सांगून मोकळे होता. त्यावेळी तुमचा तोल सांभाळणे गरजेचे आहे. त्यामुळे पार्टनरच्या पूर्वीच्या रिलेशनशीपबद्दल कोणत्याही गोष्टी इतरांशी शेअर करु नका. त्यामुळे पार्टनरला वाईट वाटू शकते. त्याचबरोबर तुमच्या फ्रेंड्सच्या नजरेत तुमच्या पार्टनरची इमेज खालावू शकते. यामुळे फायदा काहीच होणार नाही. झाले तर नुकसानच होईल.


आर्थिक समस्यांसंबंधित गोष्टी


तुमचा पार्टनर आर्थिक समस्येतून जात असल्यास ही गोष्टी तुम्ही कोणालाही सांगू नका. त्यामुळे त्याला/तिला मदत होण्याऐवजी त्रास अधिक वाढेल. त्याचबरोबर तुमच्या रिलेशनशीपबद्दल तुमच्या फ्रेंड्सचा दृष्टीकोन बदलेल.