मुंबई : वजन कमी करण्यासाठी जे सल्ले दिले जातात त्यात सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात लिंबू पिळूण प्या. आपणा सर्वांना या उपायाबद्द्ल चांगलेच माहिते आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेकजण या उपायाचं कौतुकही केलं जातं. पण याचे काही नुकसानही आहेत हे अनेकांना माहिती नसतं. जर तुम्ही जास्त लिंबू पाणी सेवन केल्यास त्याचे अनेक साइड इफेक्ट्सही होतात.   


छातीत जळजळ होऊ शकते


लिंबू अ‍ॅसिडीक फ्रुट आहे आणि त्याचं जास्त सेवन केल्यास याने छातीत जळजळ होण्याची समस्या होऊ शकते. जर तुम्हाला पित्ताचा त्रास असेल तर जास्त लिंबू पाणी पिणे टाळा. 


दातांचं नुकसान


लिंबूमध्ये असलेल्या अ‍ॅसिडमुळे दातांचं नुकसान होतं. यामुळे नॅच्युरल श्युगर लेव्हलमध्ये कमतरता येते आणि मग दात खराब व्हायला लागतात. त्यामुळे जर जास्त लिंबू पाण्याचं सेवन केल्यास दातांमध्ये सेंसिटीव्हीटी आणि कॅव्हिटीची समस्या वाढू शकते. 


सतत यूरिनेशनची समस्या


लिंबूच्या रसाचं जास्त सेवन केल्यास आरोग्याशी निगडीत आणखी एक समस्या निर्माण होऊ शकते. ही समस्या म्हणजे सतत यूरिनेशनला जावे लागणे, ज्याने डिहायड्रेशनचा धोका अधिक असतो. अशात डिहायड्रेशनच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी पाणी पिणे वाढवले पाहिजे. 


मायग्रेनच्या रूग्णांसाठी ठिक नाही


लिंबू पाणी पिल्याने काही रूग्णांमध्ये मायग्रेनची समस्या पुन्हा सुरू होऊ शकते. याचं कारण म्हणजे आंबट फळांमध्ये टायरामीन असतं ज्याने मायग्रेनची समस्या वाढते. व्हिटामिन सी शरीरासाठी खूप आवश्यक आहे. पण याचं प्रमाण कमी करा. 


तोंडातील फोडं वाढतात


जर तुम्हाला तोंडात फोडं झालेले आहेत तर लिंबू पाण्याचं सेवन करू नका. याने फोडं आणि त्यासंबंधी त्रास आणखीन वाढू शकतो. ज्या लोकांना  अ‍ॅसिडीक फूडमुळे अ‍ॅलर्जी आहे त्यांनीही लिंबू पाण्याचं सेवन करू नये.