Saffron Milk Make Babies Fair: गर्भवती महिलांसाठी महत्त्वाची बातमी...आपण आई (mother)होणार म्हटल्यावर सगळ्यात पहिले खाण्यापिण्यावर लक्ष द्यावं लागतं. गर्भवती (Pregnancy) असताना काही पदार्थ खाल्ल्यामुळे बाळाला फायदा (benefit) होतो तर काही पदार्थांचं सेवन केल्यास नुकसान होतं.  आपण गर्भवती आहोत हे कुंटुबातील महिलांना कळल्यावर आपल्याला अनेक सल्ले दिले जातात. असं करु नकोस तसं करु नकोस, बाळाला त्रास होतो. तर असं कर हे खा यामुळे बाळ निरोगी होतं. यातील सगळ्यात महत्त्वाचा सल्ला म्हणजे केसरयुक्त दुधाचं सेवन कर...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रत्येक आईला वाटतं आपलं बाळ निरोगी (baby healthy) असावं आणि ते गोरं व्हावं. मुलगा (son)असो वा मुलगी (girl)  गोरेपान आणि निरोगी असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. मग आजी (grandma) आणि आईकडून सांगण्यात येते की केसरयुक्त दूध घे (Saffron Milk), यामुळे बाळ गोरपान होतं. पण खरंच केशर दूध प्यायल्याने बाळ गोर होतं का? यामागे खरंच काही वैज्ञानिक कारण आहे का? याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. (drinking Saffron milk during pregnancy makes baby fair nm)


तज्ज्ञांचं काय म्हणं आहे?


बाळाचा रंग हा गोरा (fair) की काळा (black) हे मेलॅनिनच्या (Melanin) पातळीवर अवलंबून असतं, असं स्टार हॉस्पिटलचे स्त्रीरोग (Gynecology) आणि प्रसूतीतज्ज्ञ डॉ. विजय लक्ष्मी (Dr. Vijay Lakshmi) यांनी माहिती दिली आहे. शरीरातील मेलेनिनच्या उच्च पातळीमुळे बाळाची त्वचा काळी होते तर मेलेनिनचे प्रमाण संतुलित असेल तर त्वचेचा रंग हा पांढरा असतो. बाळ गोरा होण्यासाठी केशर खाणे किंवा केशर दूध पिणे फायदेशीर आहे याचा कोणताही शास्त्रीय पुरावा नाही.


गरोदरपणात केशर खाणे योग्य की अयोग्य?


केशरमध्ये असलेले औषधी गुणधर्म आरोग्यासाठी खूप फायदेशीर असल्याने गरोदरपणात केशर खाणे चांगले मानले जातं.गरोदरपणात केशर खाल्ल्याने महिलांचा तणाव (stress) कमी होतो आणि मूड स्विंगच्या (Mood swings) समस्येतही फायदा होतो. गर्भवती महिलांनी (pregnant women) दररोज संतुलित प्रमाणात केशर खाल्ल्याने फायदा होतो.प्रसूतीदरम्यान (during labor) होणारा त्रास कमी करण्यासाठी केशर (kesar) खाणे देखील फायदेशीर आहे. मात्र काही संशोधना आणि अभ्यास अशीही माहिती समोर आली आहे की, गरोदरपणात केशर खाल्ल्याने गर्भपात (Abortion) होण्याचा धोकाही वाढतो.म्हणून गरोदरपणात केशर जास्त प्रमाणात खाणे टाळावे.गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीत जास्त केशर खाल्ल्याने अनेक समस्या उद्भवू शकतात.त्यामुळे गरोदरपणात डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय केशरचे सेवन करू नये.



 (Disclaimer : येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. कृपया या माहितीचा वापर करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या. Zee 24 Tass या माहितीची खातरजमा करत नाही.)