सकाळी रिकाम्या पोटी चहा पिताय, शरीराला होईल मोठी हानी
सकाळी सकाळी उठून चहा पिण्याची बहूधा सर्वांनाच सवय असते.
मुंबई : सकाळी सकाळी उठून चहा पिण्याची बहूधा सर्वांनाच सवय असते, काही जण तर सकाळपासून रात्रीपर्यंत दिवसभरात 10 पेक्षा जास्त चहा पितात. मात्र जर तुम्हालाही सकाळी लवकर चहा पिण्याची सवय असेल तर ते तुमचे नुकसान करू शकते. कारण बहुतेक लोक सकाळी रिकाम्या पोटी चहा नाश्ता न करता पितात, ज्यामुळे मोठी हानी होते.
सकाळी चहा पिण्याआधी आपले पोट रिकाम असतं. आणि आपण काही न खाता चहा घेतला तर त्याचा आपल्याला मोठा धोका आहे. जर आपण काही हलके खाल्ले तर त्याचे नुकसान होणार नाही. त्यामुळे चहा पिण्यापूर्वी किंवा चहासोबत थोडी बिस्किटे खा. चहा पिण्यापूर्वी एक ग्लास पाणी प्या. चहा प्यायल्यानंतर नाश्ता करा. या सर्व गोष्टी केल्याने सकाळच्या चहाचा तुमच्या शरीरावर परिणाम होणार नाही.
जर आपण सकाळी उठल्याबरोबर चहा प्यायलो तर रात्रभर तोंडात बॅक्टेरिया तयार होतात. तो चहा प्यायल्याने तो चहासोबत पोटात जातो आणि शरीराला हानी पोहोचवतो. जर तुम्ही जास्त चहा प्यायला लागाल तर त्यामुळे अनेक आजार होतात.