गरजेपेक्षा अधिक पाणी प्यायल्यास उद्भवू शकतात या ५ समस्या!
उन्हाळा असो किंवा हिवाळा भरपूर पाणी पिण्याचा सल्ला हमखास दिला जातो.
मुंबई : उन्हाळा असो किंवा हिवाळा भरपूर पाणी पिण्याचा सल्ला हमखास दिला जातो. घरातील वरिष्ठ मंडळी, तज्ञ हे नेहमी भरपूर पाणी पिण्यास सांगतात. उन्हाळ्यात तर पाण्याची गरज अधिक वाढते. पण तुम्हाला हे माहित आहे का? की गरजेपेक्षा अधिक पाणी प्यायल्याने अनेक समस्या उद्भवू शकतात. एका संशोधनातून ही बाब समोर आली आहे. पाहुया गरजेपेक्षा अधिक पाणी प्यायल्यास काय होऊ शकते....
हायपोट्रिमियाचा धोका
शरीरात पाण्याचे प्रमाण अधिक झा्ल्याने सोडिअमचे प्रमाण जलद गतीने वाढते. त्यामुळे डोक्याला सूज येऊ शकते. सुज वाढल्यास हायपोट्रिमियाचा धोका वाढतो.
पचनक्रिया प्रभावित होते
भरपूर पाणी प्यायल्याने अन्नपचनास मदत होते. पण पाण्याच्या अतिरिक्त प्रमाणामुळे अन्नपचनासाठी मदत करणारा पाचन रस काम करणे बंद करतो. त्यामुळे अन्न उशिरा पचते आणि पोटासंबंधित विकार जडण्याची शक्यता उद्भवते.
हार्टअॅटकचा धोका
अनेकदा अधिक पाणी प्यायल्याने हृदयविकार किंवा हार्टअॅटकचा धोका वाढतो. बायपास सर्जरी झालेल्या रुग्णांना कमी पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.
किडनीची समस्या
अधिक पाणी प्यायल्याने किडनीवर दबाव पडतो. यामुळे किडनीची समस्या होऊ शकते. कारण अधिक पाणी प्यायल्याने किडनीला क्षमतेपेक्षा अधिक काम करावे लागते.
झोप कमी येते
अधिक पाणी प्यायल्याने रात्री नीट झोप येत नाही. वारंवार लघवीला जावे लागते. मधुमेहींना रात्री कमी पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. कारण अधिक पाणी प्यायल्याने मधुमेहींना रात्री बरेचदा लघवीला जावे लागते.
किती पाणी गरजेचे?
स्वस्थ शरीराला पाण्याचे संतुलित प्रमाण आवश्यक असते. सामान्य दिनचर्या असल्यास एका दिवसात कमीत कमी ८ ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे. जर तुम्ही अधिक शारीरिक श्रम असलेले काम करत असाल तर त्यानुसार शरीरात पाण्याचा इनटेक वाढवा.