Copper Water Side Effects: तांब्याच्या भांड्यातून पाणी पिणे आरोग्यासाठी लाभदायक ठरत असं म्हटलं जातं. तांबे धातू नैसर्गिक जंतुनाशक आहे. त्यामुळं अनोषापोटी तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यायाल्याने अनेक आजारांवर नियंत्रण मिळवता येते. मात्र, तांब्याच्या भांड्यातून पाणी पिताना योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे असते. चुकीच्या पद्धतीने पाणी प्यायल्याने शरीराचे नुकसानही होऊ शकते. तांब्याच्या भांड्यातून पाणी कसं प्यावे, याचा आढावा घेऊयात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तांब्याच्या भांड्यात पाणी पिणे फायदेशीर असल्याचं सिद्ध झाले आहे. गेल्या काही वर्षांपासून तांब्याच्या भांड्याची विक्रीदेखील वाढली आहे. तांब्यात अनेक मिनरल्स असतात जे शरीरासाठी लाभदायक असतात. तांब्यांच्या भांड्यातून पाणी प्यायल्याने शरीरातील लाल रक्तपेशी वाढतात त्याचबरोबर हाडांना बळकटी येते. एका अहवालानुसार, तांब्याच्या भांड्यात पाणी पिण्याचे काही नुकसानदेखील आहेत. 


एका संशोधनानुसार, तांब्याची अधिक मात्रा शरीरात गेल्यास कॉपर टॉक्सीसिटी होण्याची शक्यता आहे. यामुळं उलटी होणे, पोटात दुखणे, बद्धकोष्टता अशा आरोग्याच्या तक्रारी उद्भवू शकतात. 


 कॉपर टॉक्सीसिटी म्हणजे काय?


 कॉपर टॉक्सीसिटी म्हणजे तांब्याच्या भांड्यात जास्त काळ ठेवलेले पाणी प्यायल्याने ही स्थिती निर्माण होते. अशावेळी पाण्यात तांब्याची जास्त मात्र मिसळली जाते. 


कॉपर टॉक्सीसिटी साइड इफेफ्ट


कॉपर टॉक्सीसिटीच्या साइड इफेक्टमुळं लिव्हर डॅमेज आणि किडणीचा आजारदेखील होऊ शकतो. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिलेल्या माहितीनुसार, पिण्याच्या पाण्यात २ मिलिग्राम प्रती लीटर याहून अधिक तांबे असू नये.


एका संशोधनानुसार, तांब्याच्या भांड्यात 16 तासांपर्यंत ठेवलेल्या पाण्यात तांब्याची मात्रा कमी प्रमाणात आढलली गेली आहे. त्यामुळं धातूच्या भांड्यात 16 तास पाणी ठेवल्याने त्यातील बहुतांश बॅक्टेरिया नष्ट झाल्याचे अभ्यासात आढळून आले आहे. मात्र त्या पेक्षा जास्त तास तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवले शरीरासाठी घातक ठरु शकते. तज्ज्ञांच्या मते, दररोज 3 कप म्हणजेच 710 एमएल इतक्या प्रमाणात तांब्याच्या भांड्यात ठेवलेल्या पाण्याचे सेवन करावे. यापेक्षा अधिक सेवन करणे टाळावे. 


तांब्याच्या भांड्यात लिंबू व मध घातलेले पाणी प्यायल्यानंतर ते रोटात विषासारखे काम करते.लिंबूमध्ये आढळणारे अॅसिड तांब्यासोबत मिक्स होऊन शरीरात अॅसिड तयार होते, ज्यामुळे पोटदुखी, पोटात गॅस आणि उलट्या होण्याचा धोका असतो. तसंच, तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यानंतर शक्यतो अर्धा तास दूध किंवा चहा पिऊ नये.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)