तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी पिणे आरोग्यास लाभदायक
पाणी तांब्याच्या पेल्यात प्यायल्यास अरोग्यास त्यास फायदा होतो.
मुंबई : रोज सकाळी पाणी प्यावे हे घरातले त्याचबरोबर डॉक्टर देखील सांगतात. पण पाणी तांब्याच्या पेल्यात प्यायल्यास अरोग्यास त्यास फायदा होतो. काही वर्षापूर्वी सर्वांच्याच घरी तांब्याची भांडी असायची. मात्र कालांतराने काचेची,स्टील ची भांडी वापरण्यास सुरुवात झाली. तांब्यांच्या भांड्यांची अनेक वैशिष्ट्ये आहेत. तांब्याच्या भांड्यातून पाणी पिणे केव्हाही चांगले कारण आरोग्याला उपयुक्त तांब्याचा अंश शरीरात जातो. त्यामुळे पाण्यातील रोगजंतू मरून जातात. तांब्यामुळे यकृत आणि मूत्राशय असे महत्वाचे अवयव सशक्त होतात. तांब्यामुळे आपल्या मेंदू आणि मज्जासंस्थेला मदत होते.
तांब्यामध्ये ऍन्टिऑक्सिडेंट तत्व असल्यामुळे तांबे हे उत्तम ऍन्टिएजिंग आहे. त्यामुळे हाडे व स्नायू मजबूत होतात आणि क्तदाब समप्रमाणात होण्यास मदत होते. ऍन्टिइनप्लमेट्री असल्यामुळे संधीवातासारखे आजार बरे होण्यास मदत होते. अशा प्रकारे तांब्याचा वापर करून आपण आपले आयुष्य सुकर करू शकतो.
पाण्याचा साठा तांब्याच्या भांड्यांमध्ये साठवणं फायदेशीर असले तरीही दही,दूध, लिंबूपाणी यासारखे आंबट आणि अॅसिडिक पदार्थ तांब्याच्या भांड्यामध्ये साठवू नका. नियमित पाणी साठवण्यासाठी आणि पिण्यासाठी तांब्याच्या भांड्यांचा वापर केला जातो. मात्र जेवणासाठी तांब्याचा भांड्याचा वापर करणं आरोग्याला त्रासदायक ठरू शकते.