what to do after cardiac arrest:  हृदयविकाराच्या झटक्यादरम्यान, जगण्याची शक्यता जास्त असते, परंतु कार्डिएक अरेस्ट ( cardiac arrest) वेळी ही शक्यता खूपच कमी असते. अशा परिस्थितीत रुग्णाला वेळेत उपचार न मिळाल्यास रुग्णाला आपला जीव गमवावा लागतो. काही वेळा सुविधांअभावी वेळेवर उपचार मिळत नाहीत. अशा परिस्थितीत आपत्कालीन काळात हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णाला वेळीच सीपीआर दिल्यास त्याचा जीव वाचू शकतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कार्डियाक अरेस्ट (cardiac arrest) मध्ये हृदय अचानक काम करणे किंवा धडधडणे थांबवतं. अशा स्थितीत रुग्णवाहिका येण्यापूर्वी जवळच उभ्या असलेल्या एखाद्याने पीडितेला सीपीआर दिल्यास रुग्णाचा जीव वाचू शकतो. (during cardiac arrest know how to do CPR correctly aftrer south korea stampede )


सीपीआर देणं म्हणजे काय ? (CPR) )


कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशन (CPR) ही एक प्रकारची मसाज थेरेपी प्रक्रिया आहे. यात मेंदूला ऑक्सिजन मिळत राहावा यासाठी कृत्रिम पद्धतीने रुग्णाला ऑक्सिजन दिला जातो. डॉक्टरांनी सांगितल्यानुसार कार्डियाक अरेस्ट दरम्यान, सीपीआर असलेल्या रुग्णाच्या जगण्याची शक्यता खूप वाढते, कारण जर मेंदूला 3 मिनिटे ऑक्सिजन मिळत नाही, तर मेंदू काम करणं थांबवतो. हृदयविकाराच्या वेळी हृदयाची गती अचानक थांबते.


हार्ट अटैक आणि  कार्डियाक अरेस्ट (cardiac arrest) या दोन वेगळ्या समस्या आहेत. तुमच्या  सोबत कोणी असेल आणि त्याला असं  काही झाल्यास ताबडतोब  सीपीआर देऊन  तुम्ही त्यांचा जीव नक्कीच वाचवू शकता.


CPR देण्याची योग्य पद्धत 


कार्डियाक अरेस्ट (cardiac arrest) आलेल्या व्यक्तीला सर्वात आधी सपाट जागेवर सरळ झोपवावे, लक्षात ठेवा की तुम्हाला  हे सर्व खूप लवकर करायचे असेल. 


झोपवल्यानंतर दोन्ही हातांची बोटे एकमेकांमध्ये गुंफून घ्या, थोड्या थोड्या अंतराने रुग्णाची दोन्ही हातानी दाबावी. 


सामान्य हृदयाचा ठोका 60-100 असतो. अशा स्थितीत रुग्णाची छाती 1 मिनिटात 60 वेळा दाबण्याचा प्रयत्न करा.


अधून मधून नाक बंद करा आणि तोंडात जोरात श्वास द्या (Mouth to mouth Breathing)


हे सर्व करत असताना हे नेहमी लक्षात ठेवा तुम्हाला रुग्णाची छाती जोरजोरात डबा हे चालूच ठेवायचं आहे. 


छाती इतक्या जोरात दाबायची आहे कीव प्रत्येक वेळी छाती जवळपास दीड इंच खाली जाते.


कार्डियाक अरेस्ट आल्यावर असा द्या CPR..वाचवू शकता  जीव 


कार्डियाक अरेस्टनंतर घाबरू नका.. अवघ्या काही सेकंदात  असा वाचवा जीव 


वाचेल जीव  काही मिनिटात वाचू शकतो जीव..केवळ या एका गोष्टीमुळे.. 


शनिवारी रात्री इटावॉन लेजर जिल्ह्यात हॅलोवीन पार्टीचं (Halloween Party) आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. त्यानंतर चेंगराचेंगरीत अनेक लोक जखमी झाल्याले. यातील 50 जणांना हृदयविकाराचा झटका (cardiac arrest) आला.


दक्षिण कोरियात (south korea) हॅलोविन पार्टीदरम्यान (Halloween Party) झालेल्या चेंगराचेंगरीत (Stampede) मृतांची संख्या 151 वर पोहोचली आहे. तर शेकडो लोक जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


स्थानिक पोलिसांचे म्हणणे आहे की या घटनेनंतर 50 हून अधिक लोकांना हृदयविकाराचा झटका ( cardiac arrest) आला होता. ही घटना घडली त्यावेळी 4 मीटर रुंद रस्त्यावर एक लाखाहून अधिक लोक उपस्थित होते. यानंतर अचानक घटनास्थळी चेंगराचेंगरी झाली.


अनेक लोक रस्त्यावर पडून होते. पोलीस रस्त्यावरील लोकांना सीपीआर (CPR) देताना दिसले.(South Korea Halloween 150 Dead In Stampede)