Blood Cancer Symptoms : `ही` आहेत ब्लड कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं; कोणत्या चाचण्या कराव्यात?
ब्लड कॅन्सरला वैद्यकिय भाषेत हेमॅटोलॉजिकल कॅन्सर असं संबोधलं जातं. यामध्ये रक्त, अस्थिमज्जा आणि लिम्फॅटिक सिस्टीम यासारख्या अनेक प्रकारच्या कर्करोगांचा समावेश असतो.
कॅन्सरचं नाव घेतलं की, प्रत्येकाला घाम फुटतो. कॅन्सरमध्ये जीवन मरणाचा संघर्ष असतो. प्रसिद्ध अभिनेत्री हिना खान ही सध्या ब्रेस्ट कॅन्सरशी लढा देत आहे. खूप कमी जण कॅन्सवर मात करु शकतात. या जीवन घेणाऱ्या आजाऱ्याची लक्षणंही सहज लक्षात येतं नाही. ब्लड कॅन्सरचेही असंख्य रुग्ण या जगात आहेत. वैद्यकीय भाषेत याला हेमॅटोलॉजिकल कॅन्सर असं म्हटलं जातं. रक्त, अस्थिमज्जा आणि लिम्फॅटिक सिस्टीम यासारख्या अनेक प्रकारच्या कर्करोगांचा समावेश या असतो. यामध्ये ल्युकेमिया, लिम्फोमा आणि मायलोमा यांसारख्या कर्करोगांचा समावेश असून या कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे अनेकदा अस्पष्ट असतात. त्याशिवा ती इतर सामान्य आजारांसारखी दिसतात. त्यामुळे कॅन्सर असल्याचा नोंद सहज लक्षात येतं नाही. काही चाचण्यानंतरच ब्लड कॅन्सर असल्याच लक्षात येतं. (Early symptoms of blood cancer What tests should be done health news in marathi )
न्यूबर्ग डायग्नोस्टिक्सच्या प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ.विज्ञान मिश्रा यांनी ब्लड कॅन्सरची लक्षणे आणि चाचणीच्या सांगितल्या आहेत. ज्या प्रत्येकासाठी जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
ब्लड कॅन्सरची लक्षणं
1. अचानक आणि असाधारण थकवा
रक्त कर्करोगाचे पहिले आणि सर्वात सामान्य लक्षण म्हणजे असाधारण थकवा. हा थकवा कोणत्याही उघड कारणाशिवाय येतो आणि विश्रांती घेतल्यानंतरही जात नाही. जर तुम्हाला सतत थकवा जाणवत असेल आणि त्याचे कारण समजत नसेल, तर हे ब्लड कॅन्सरचे प्रारंभिक लक्षण ते असण्याची दाट शक्यता आहे.
2. वारंवार संसर्ग
रक्त कर्करोग शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करतं. ज्यामुळे वारंवार संक्रमण होते. रुग्णांना वारंवार सर्दी, फ्लू किंवा इतर संसर्ग होऊ शकतो आणि बरे होण्यासाठी नेहमीपेक्षा जास्त वेळ लागू शकतो. जर तुम्ही वारंवार आजारी पडत असाल तर ते एक चेतावणी चिन्ह तुमच्यासाठी असू शकतं.
3. शरीरावर अचानक निळ्या रंगाच्या खुणा किंवा रक्तस्त्राव
जर तुमच्या शरीरावर कोणत्याही कारणाशिवाय निळ्या रंगाच्या खुणा दिसल्या किंवा तुमच्या नाकातून वारंवार रक्त येत असेल किंवा हिरड्यांमधून रक्त येत असेल तर ते ब्लड कॅन्सरचं लक्षण असू शकतं. शरीरात प्लेटलेट्सच्या कमतरतेमुळे ही समस्या उद्भवते, ज्यामुळे रक्ताच्या गुठळ्या तयार होण्यास मदत होते.
4. गुठळ्या (सुजलेल्या लिम्फ नोड्स)
जर तुम्हाला मान, बगल किंवा मांडीच्या भागात लिम्फ नोड्स सुजल्या असतील, तर ते लिम्फोमाचे लक्षण असू शकतं. जो रक्त कर्करोगाचा एक प्रकार आहे. या सुजलेल्या गुठळ्यांमुळे वेदना होत नाहीत, मात्र त्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकतं.
5. हाडांमध्ये वेदना
मायलोमासारख्या काही रक्त कर्करोगामुळे हाडांमध्ये, विशेषत: पाठ किंवा बरगड्यांमध्ये वेदना होऊ शकतात. तुम्हाला तुमच्या हाडांमध्ये सतत वेदना होत असल्यास, ते गांभीर्याने घ्या आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या.
6. फिकट त्वचा किंवा अशक्तपणा
रक्त कर्करोगामुळे, लाल रक्तपेशींची संख्या कमी होऊ शकतं, ज्यामुळे अशक्तपणा येतो. यामुळे फिकट त्वचा, श्वास लागणे आणि चक्कर येणे होऊ शकतं. ही लक्षणे दिसल्यास ताबडतोब तपासणी करा.
7. कारण नसताना वारंवार ताप
कोणत्याही उघड कारणाशिवाय ताप येणे आणि रात्री घाम येणे हे देखील ब्लड कॅन्सरचं लक्षण असू शकतं. ही लक्षणे वारंवार येतात आणि जातात, त्यांचे कोणतेही स्पष्ट कारण नसतं. त्यामुळे त्वरित डॉक्टरांकडे जावं.
ब्लड कॅन्सरच्या चाचण्या
* कम्प्लीट ब्लड काउंट (CBC) : ही चाचणी रक्तातील लाल रक्तपेशी, पांढऱ्या रक्तपेशी आणि प्लेटलेट्सची पातळी मोजते. असामान्य संख्या रक्त कर्करोग दर्शवू शकते.
* बोन मॅरो बायोप्सी : या प्रक्रियेमध्ये अस्थिमज्जेचा एक छोटा नमुना काढून त्यात कर्करोगाच्या पेशींची उपस्थिती तपासली जाते.
* इमेजिंग चाचण्या : शरीराच्या इतर भागांतील कर्करोगाच्या लक्षणांची तपासणी एक्स-रे, सीटी स्कॅन किंवा पीईटी स्कॅनद्वारे केली जाते.
* सायटोजेनेटिक चाचणी : ही चाचणी रक्ताचा कर्करोग शोधण्यासाठी रक्त किंवा अस्थिमज्जा पेशींच्या गुणसूत्रांची तपासणी करते.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)