तमालपत्र- दिवसभराचा ताण दूर करण्याचा सोपा उपाय !
मुंबई : आजकाल सगळेच कामावरून थकून भागून घरी येतात. मन-शरीर ताण आणि थकवा याने ग्रासलेले असले तरी पटकन झोप लागत नाही. हा अनुभव तुम्हाला देखील आला असेल?
मुंबई : आजकाल सगळेच कामावरून थकून भागून घरी येतात. मन-शरीर ताण आणि थकवा याने ग्रासलेले असले तरी पटकन झोप लागत नाही. हा अनुभव तुम्हाला देखील आला असेल? अशावेळी हा घरगुती उपाय करून बघा. यामुळे ताण दूर होऊन तुम्हाला शांत वाटेल. हा उपाय करण्यासाठी तमालपत्र गॅसवर जाळा. हे इतके सोपे आहे. त्यातून येणाऱ्या सुगंधी वासामुळे तुम्हाला पाच मिनिटात शांत वाटेल. मसाल्याच्या पदार्थांमधील या तमालपत्राचे अनेक फायदे आहेत. यामुळे मधुमेहींमध्ये इन्सुलिनचे कार्य सुरळीत होते, कार्डिओव्हॅस्कुलर आजारांचा धोका कमी होतो. तसंच त्यात अँटीफंगल गुणधर्म असतात. त्यातून मिळणाऱ्या असंख्य आरोग्यदायी फायद्यांमुळे तुम्ही त्याचा वापर करू शकता.
तमालपत्र जाळणे हा जुना पारंपारिक उपाय आहे. तुम्ही जर कधी कुठल्या स्पा किंवा योग सेन्टरला भेट दिली असेल तर त्या ठिकाणी पान, औषधी वन्सपती जाळल्याचा एक विशिष्ट प्रकारचा वास येतो. या वासामुळे हवा शुद्ध होते व त्याचा परिणाम माणसाच्या मूडवर होतो. त्याचप्रमाणे तमालपत्र जाळल्याने antioxidant Laurel ची निर्मिती होते. तुळशीचं पान चघळा आणि तणावमुक्त व्हा !
तमालपत्र जाळण्याची योग्य पद्धत:
१. ३-४ तमालपत्र घ्या. (तितकी पुरेशी आहेत.) ती कपड्याने किंवा टिशु पेपरने स्वच्छ पुसा. तसंच ती कोरडी आहेत का, याची खात्री करा.
२. अल्युमिनियम ट्रे किंवा भाजण्यासाठी योग्य असं कोणतही भाडं घ्या आणि त्यात ही पाने टाका.
३. पटकन आग खेचून घेतील अशा कोणत्याही गोष्टीपासून ट्रे/ भांडे दूर ठेवा. त्यावर सूर्यप्रकाश आणि वाऱ्याचा हलकासा झोत येणार नाही, असे पहा.
४. त्यानंतर जळती माचिसची काडी पानांजवळ न्या. पाने जळू लागतील.
५. किंवा मेणबत्तीवर देखील तुम्ही ही पाने जाळू शकता.
६. ज्या खोलीत तुम्ही हा प्रयोग करणार ती खोली बंद असेल, असे पहा. कारण त्यामुळे त्यातून निघणारा धूर खोलीत दरवळेल आणि तुम्हाला अपेक्षित परिणाम जाणवेल.