WEIGHT LOSS NEWS: आजकाल बरेच लोक वाढत्या वजनामुळे चिंतीत आहेत यासाठी बरच प्रयत्न केले जातात मात्र कितीही प्रयत्न केले तरी काहीच फायदा होताना दिसत नाही.वजन कंट्रोल करण्यासाठी काही लोक अंडी आणि पनीर खातात कारण दोघांमध्येही कॅलरी आणि प्रोटीनच प्रमाण सर्वात जास्त असतं कारण प्रोटीन उशिरा पचतं आणि त्यामुळे भूक लवकर लागत नाही. 
शिवाय पनीर आणि अंडी भूक कमी करणाऱ्या हार्मोन्स ना चालना देतात मात्र पनीर आणि अंडी एकत्र खावे का यावर नेहमी प्रश्न विचारले जातात यासंबंधी नेहमी संभ्रम असतो 


 पनीरमुळे वजन कमी होतं ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पनीर हा आपल्यासाठी इन्स्टंट एनर्जी सोर्स आहे ज्यामुळे आपण डेली लाईफ ऍक्टिव्हिटीज अगदी सहज करू शकतो मात्र पनीर खातेवेळी एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायला हवी ती म्हणजे पनीर पासून बनवलेले पदार्थ जे खायला अतिशय चविष्ठ असतात त्यांचं सेवन मात्र तुमचं वजन वाढवू शकतात मुख्यतः असे पदार्थ ज्यात मसाला आणि तेलाचा वापर जास्त प्रमाणात केलेला असेल.दिवसाला काही प्रमाणातच तुम्ही पनीर खायला हवं नाहीतर फायदा होण्याऐवजी तुमचं नुकसान जास्त होईल 


अंडी खाण्याचे फायदे 


यात काहीच शंका नाही कि अंड आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर आहे.हे खाल्ल्याने शरीराला एमिनो ऍसिड  भरपूर प्रमाणात मिळत. अंड खाल्ल्याने मेटाबॉलिज्म बूस्ट करून वजन कमी होण्यास खूप फायद्याचं ठरत यामुळे तुमच्या पोटाजवळील आणि कमरेजवळील चरबी कमी होते 
  


पनीर आणि अंड एकत्र खाल्ल्याने होतो फायदा ?


वजन कमी करायचंय आणि मसल्स स्ट्राँग करायचे असतील पनीर आणि अंडी उत्तम पर्याय आहे... प्रोटीन आपल्या शरीरात सावकाश पचलं जात आणि त्यामुळे आपल्याला कमी भूक लागते किंवा बऱ्याच वेळाने भूक लागेल मात्र पनीर असो किंवा अंडी योग्य  प्रमाणात खाल्यानेच यांचा फायदा मिळू शकतो हे नक्की