रात्री उशिरा जेवल्यामुळं रोज होतेय Acidity? सकाळी उठताच खा `हे` एक फळ, लगेचच मिळेल आराम
Acidity Home Remedy : कामाचा ताण आणि त्यात ऑफिसच्या वेळा त्यामुळे रात्री उशिरा जेवण होतं. रात्री पोटभर जेवण केल्यानंतर हमखास सकाळी उठल्यावर अॅसिडीटीचा त्रास होतो. पण हे एक फळ खाल्ल्यास तुम्हाला यापासून नक्कीच आराम मिळेल.
Home Remedies for Acidity : गेल्या काही वर्षांमध्ये अॅसिडीटीची समस्या वाढल्याच दिसून येते आहे. 10 पैकी 8 जणांना तर अॅसिडीटीचा त्रास असतोच. यामागे कारण म्हणजे बदलेली जीवनशैली, कामाचा वेळा, बाहेरच्या खाण्यावर भर, फास्ट फूड आणि मसालेदार खाणे यामुळे अॅसिडीटीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. दिवसा कामामुळे व्यस्थित जेवण होत नाही, अशात रात्री पोटभर तर कधी कधी मसालेदार जेवण खाल्लं जातं. त्यामुळे सकाळी उठल्यावर साहजिक अॅसिडीटी होते. आंबट ढेकर आणि जळजळमुळे आपण बेहाल होतो.
अॅसिडीटीवर मात करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला जबरदस्त घरगुती उपाय सांगणार आहोत. अॅसिडीटी होऊ नये म्हणून एक फळ खाल्ल्यास तुम्हाला फायदा होऊ शकतो.
हे फळ अॅसिडीटीवर रामबाण!
अॅसिडीटीवर मात करण्यासाठी सकाळी उठल्यावर उपाशीपोटी केळ खाल्ल्यास तुम्हाला फायदा होईल, असं आयुर्वैदात सांगण्यात आलंय. तज्ज्ञ सांगतात केळ हे पचनासाठी हलकं असतं. शिवाय या फळामध्ये आम्ल कमी असल्याने अॅसिडीटी कमी करण्यासाठी फायदेशीर मानलं जातं. शिवाय केळमध्ये पोटॅशियम आणि फायबर भरपूर प्रमाणात असल्याने पचनसंस्था तंदुरुस्त राहण्यास मदत मिळते. अॅसिडीटी आणि बद्धकोष्ठता सारख्या समस्यांवर मात करण्यासाठी केळी खाणे बेस्ट मानलं जातं.
केळ खाण्याची योग्य पद्धत काय?
सकाळी उठताचं उपाशी पोटी एक किंवा दोन केळं खावं त्यामुळे अॅसिडीटीवर नियंत्रण मिळवण्यास मदत मिळते. याशिवाय तुम्ही केळीचं सेवन दह्यासोबत किंवा सलाडमध्येही करु शकता.
अॅसिडीटी झाल्यास 'या' गोष्टींची काळजी घ्यावी!
सकाळी उठल्यानंतर एक ग्लास गरम पाणी प्यायल्यास अॅसिडीटी कमी होण्यास मदत मिळते. शिवाय अॅसिडीटी झाल्यास सकाळी उठल्यावर कॉफी किंवा चहा अॅसिडीटी घेऊ नये, अन्यथा तुमचा त्रास वाढेल.
अॅसिडीटी होऊ नये म्हणून ही गोष्ट नक्की करा!
अॅसिडीटी होऊ नये म्हणून रात्रीचं जेवण झोपण्याच्या 3 तासापूर्वी करावे. या उपायामुळे सेवन केलेले अन्न पचण्यास पुरेसा वेळ मिळतो. जर झोपण्याची वेळ झाली आणि जेवण राहिली असेल तर अशावेळी हलका आहार उदाहरणात मूगाची खिचडीचं सेवन करावं आणि पुरेशी झोप घ्यावी.
( Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. )