मुंबई : चहा हे पेय भारतात प्रचंड लोकप्रिय. डोकं दुखत असेल तर चहा प्या, थकवा वाटत असेल तर चहा प्या, सर्दी - ताप असेल तर चहा प्या, गप्पा मारताना चहा प्या.... दिवसाची सुरुवातच या चहानं होते. चहाशिवाय बहुसंख्य भारतीयांचं पान हलत नाही. (eating Namkeen snacks with Tea Side Effects )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रत्येजण त्यांच्या परिनं त्यांच्या आवडीनुसार चहा बनवणं आणि त्याचा स्वाद घेणं पसंत करतो. काहीजण सवयीनुसार चहासोबत जोडीला चटपटीत, कुरकुरीत असा एखादा पजार्थ खातात. काहींना चहासोबत भजी, वडेही खाण्याची सवय असते. पण, हे दोन्ही पदार्थ एकत्र खाणं कितपत योग्य? 


चहासोबत काहीतरी चमचमीत खाणं जीभेचे चोचले पुरवले गेले तरीही त्यामुळं मोठं नुकसान होतं. जे जाणून घेतल्यानंतर तुम्ही कधीच चहासोबत हे पदार्थ खाणार नाही 


- काही नमकीन पदार्थांमध्ये माव्याचा वापर केला जातो. अशा वेळी चहासोबत त्यांचं सेवन केल्यास आम्पपित्ताचा (अॅसिडीटी) त्रास होऊ शकतो. 


- एखादा आंबटगोड तिखट चिवडा चहासोबत खाल्ल्यास त्याचे परिणाम पचनसंस्थेवर दिसून येतात. ज्यामुळं पोटाच्या काही समस्या सुरु होतात. 


- चहासोबत बेसनयुक्त पदार्थांचं सेवन टाळणं कधीही उत्तम. असं केल्यास तुम्हाला पोटाच्या समस्या, गॅसेसचा त्रास जाणवणार नाही. 


- काही चिवडे, शेव यांच्यामध्ये हळदीचा वापर केला जातो. पण, हळद आणि चहा हे दोन्ही पदार्थ एकत्र खाणं योग्य नसल्यामुळं ते टाळणंच कधीही उत्तम. 


तुम्हालाही चहासोबत असे काही पदार्थ खायची सवय असेल, तर आताच थांबा. अजूनही उशीर झालेला नाही. 


(वरील माहिती शास्त्रीय कारणांच्या आधारे घेण्यात आलेली नसून, झी 24 तास त्याबाबतची खातरजमा करत नाही.)