पनीर आणि अंड एकत्र खाल्ल्याने वजन खरंच घटतं? जाणून घ्या सत्य!
पनीर आणि अंडी एकत्र खाल्ल्याने शरीराला काही फायदा होतो का हा प्रश्न अनेकदा विचारला जातो, चला तर मग या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊया.
मुंबई : वाढतं वजन हे आजकाल बऱ्याच लोकांचं चिंतेचा विषय बनलंय. यावर सर्व प्रयत्न करूनही अपेक्षित परिणाम मिळत नाही. वजन नियंत्रित करण्यासाठी, काही लोक अंडी आणि पनीर खातात, कारण दोन्हीमध्ये कॅलरी कमी आणि प्रोटीन जास्त असतात. जेव्हा प्रोटीन उशिरा पचतात तेव्हा ते वजन कमी करण्यास मदत करते, याशिवाय या दोन्ही गोष्टी भूक कमी करणारे हार्मोन्स वाढवतात.
पनीर आणि अंडी एकत्र खाल्ल्याने शरीराला काही फायदा होतो का हा प्रश्न अनेकदा विचारला जातो, चला तर मग या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊया.
पनीरने वजन कसं कमी होतं?
पनीर हा आपल्यासाठी ऊर्जेचा स्रोत आहे ज्यामुळे आपण दैनंदिन जीवनातील कामं सहज करू शकतो, परंतु आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की पनीरचे अनेक स्वादिष्ट पदार्थ प्रत्यक्षात वजन वाढवतात. ज्या लोकांना वजन कमी करायचं आहे त्यांनी पनीर टिक्कासारखे आरोग्यदायी पर्याय निवडावेत. दिवसभरात जास्त पनीर खाणं टाळा, कारण त्यामुळे फायद्याऐवजी नुकसान होऊ शकतं.
अंड्याने वजन कसे कमी होते?
अंडी हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर अन्न मानलं जातं, ते खाल्ल्याने आपल्या शरीरातील आवश्यक अमीनो ऍसिडचं संतुलन राखलं जातं. अंडी आपलं चयापचय वाढवून वजन कमी करण्यात खूप मदत करतात. याशिवाय बेली फॅट देखील कमी होण्यास मदत होते.
पनीर आणि अंड एकाच वेळी खाल्ल्याने होईल फायदा?
वजन कमी करण्यासाठी आणि स्नायूंना बळकट करण्यासाठी प्रोटीनयुक्त अंडी आणि पनीरचं महत्त्व खूप आहे. ग्रेटर नोएडामध्ये कार्यरत असलेल्या प्रसिद्ध आहारतज्ज्ञ डॉ. आयुषी यादव यांनी सांगितलं की, वजन कमी करण्यासाठी दोन्ही गोष्टी योग्य पर्याय आहेत. प्रोटीम हळूहळू पचत असल्याने तुमचं पोट दीर्घकाळ भरलेलं राहतं. तुम्ही अंडी आणि पनीर एकाच वेळी खाऊ शकता, त्यात कोणतंही नुकसान नाही. मात्र ते जास्त प्रमाणात सेवन करणे योग्य नाही.