आहारतज्ज्ञ आयुषी यादव यांच्या मते, शांत झोपेसाठी रात्री काही पदार्थ खाणं पूर्णतः टाळायला हवं. खाली अशा पदार्थांची यादी आणि त्यांचे शरीरावर होणारे परिणाम दिले आहेत:  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 1. तिखट पदार्थ: 
मसालेदार आणि तिखट पदार्थ झोपण्यापूर्वी खाणं आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं. यामुळे पचनात अडथळा येतो आणि पोटासंबंधी समस्या जसे की, बद्धकोष्ठता, गॅस किंवा जळजळ होऊ शकते. तिखट पदार्थ शरीराचं तापमान वाढवतात, ज्यामुळे झोपण्याचा नैसर्गिक सायकल विस्कळीत होतो. त्यामुळे शांत झोप घेणे कठीण होऊ शकते.  


 2.चॉकलेट:  
चॉकलेट, विशेषतः डार्क चॉकलेट झोपेसाठी घातक ठरू शकतं. यात कॅफिन आणि थियोब्रोमाइन मोठ्या प्रमाणात असतं, जे मज्जासंस्थेवर वाईट परिणाम करतं आणि झोप उडवण्याचं मुख्य कारण बनतं. चॉकलेटमधील साखरेचं जास्त प्रमाण रक्तातील साखर वाढवतं, ज्यामुळे शरीर अधिक जागृत राहतं आणि झोपेचा त्रास होतो.  


 3. सायट्रिक फळे: 
संत्र, लिंबू, आणि द्राक्ष यांसारख्या आंबट फळांमध्ये सायट्रिक अ‍ॅसिड जास्त प्रमाणात असतो. रात्री यांचं सेवन केल्यास पचनासंबंधी समस्या किंवा अ‍ॅसिडिटी होण्याची शक्यता असते. हे पदार्थ मज्जासंस्थेवर ताण निर्माण करतात आणि शरीराचं तापमान वाढवतात, ज्यामुळे झोप कमी होते किंवा सतत खंडित होते.  


 4. सोडा आणि सॉफ्ट ड्रिंक्स: 
सोडा आणि सॉफ्ट ड्रिंक्स पचनासाठी हानिकारक असतात. यामध्ये कॅफिनचं प्रमाण खूप जास्त असतं ज्यामुळे मज्जासंस्थेला त्रास होतो आणि झोप येण्यात अडथळा निर्माण होतो. शिवाय या पेयांमधील साखर वजन वाढण्याचं मुख्य कारण ठरते आणि झोपेचं वेळापत्रक विस्कळीत होतं.  


5. जड किंवा तळकट पदार्थ:
रात्री तळलेले किंवा जड पदार्थ खाल्ल्यास पचन प्रक्रिया मंदावते. त्यामुळे पोट भरलेलं राहण्याचा त्रास होतो आणि अ‍ॅसिडिटी किंवा गॅस वाढतो. 


आरामदायी झोपेसाठी टिप्स:
झोपण्यापूर्वी हलकं, पचायला सोपं आणि कमी मसालेदार अन्न खा.  
पाणी पिण्याचं प्रमाण योग्य ठेवा, परंतु झोपेच्या अगदी आधी खूप पाणी पिऊ नका.  
रात्री कॅफिनयुक्त पेय जसे की कॉफी किंवा चहा टाळा.  
झोपण्यापूर्वी मानसिक आणि शारीरिक शांतता मिळवण्यासाठी हलकी योगा किंवा ध्यान करा.  
शांत झोप हवी असेल तर या पदार्थांपासून दूर राहा आणि आपल्या शरीराला विश्रांती देण्यासाठी योग्य आहार निवडा.