मुंबई : सध्या जीवनमान धावपळीचे आहे. घड्याळ्याच्या काड्यावर आपल्याला नाचावे लागते. त्यामुळे वेळेचं गणित सांभाळताना अनेकजण घाईगडबडीत नाश्ता करतात. पण अनेकांना हे ठाऊक नाही की त्यांची ही सवय पोटात गॅस होण्यास आमंत्रण देते. घाईघाईत खाल्याने पचनक्रिया नीट होत नाही आणि ब्लॉटिंगची समस्या उद्भवते. त्याचबरोबर खाण्यापिण्याच्या अयोग्य वेळा, अनहेल्दी पदार्थांचे सेवन ब्लॉटिंगची समस्या वाढवते. तुम्हालाही हा त्रास सातत्याने सतावतो का? मग हे घरगुती उपाय नक्की करुन पहा...


बडीशेप


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बडीशेप खाल्याने किंवा बडीशेपचा चहा घेतल्याने गॅसेसची समस्या पटकन दूर होते.


लिंबूपाणी


गॅसेसची समस्या सातत्याने होत असल्यास रोज सकाळी उठून लिंबूपाणी प्या. यामुळे ब्लॉटिंगची समस्या तर दूर होईलच पण त्याचबरोबर डिहायड्रेशनपासूनही सुटका होईल.  


तुळशीची पाने


तुळस औषधी असते, हे आपल्याला ठाऊक आहेच. त्यामुळे तुळशीची पाने खा किंवा तुळशीची पाने घालून केलेला चहा पिणे देखील फायदेशीर ठरेल.


कोथिंबीर


पोट फुगल्यावर कोथिंबीरीचा चहा प्या. गॅस, पोटदुखी यांसारख्या समस्या दूर होण्यास मदत होईल.


दही


दह्यात बॅक्टेरिया असतात. त्यामुळे पोटाचे आरोग्य चांगले राहते आणि अन्न उत्तमरीत्या पचते. 


ओवा


गॅसेसच्या समस्येवर ओवा अतिशय उत्तम ठरतो. त्यामुळे गॅस झाल्यास ओवा खा. गॅसेसची समस्या झटपट दूर होईल.


हळद


जेवण बनवताना त्यात हळदीचा वापर अवश्य करा. त्यामुळे गॅसेस, ब्लॉटिंगची समस्या दूर होते. पोटदुखीपासूनही सुटका मिळते.