सतत Adult Content पाहत असाल तर आजच थांबा; रिसर्चमध्ये धक्कादायक गोष्ट समोर!
पॉर्न फिल्म्स म्हणजेच पोर्नोग्राफीचा परिणाम तुमच्या शरीरावर तसंच डोक्यावर होताना दिसतो. चला तर मग आज पाहूया, पोर्नोग्राफीचा परिणाम तुमच्या डोक्यावर किंवा शरीरावर कसा होतो?
Effects of pornography : आज आपण 'त्या' फिल्म्सबाबत बोलणार आहोत, ज्या पाहणं अधिकतर लोकं चुकीची मानतात. काही लोकांच्या म्हणण्याप्रमाणे, अडल्ट फिल्म पाहणं खराब आणि चूक असतं. इतकंच नव्हे तर भारतात पॉर्नफिल्म बॅन आहे. मात्र तुम्हाला माहितीये का, या पॉर्न फिल्म पाहण्याचा आणि तुमच्या आरोग्याचा मोठा संबंध आहे. असं आम्ही नाही, तर याबाबत करण्यात आलेल्या रिसर्चनुसार, हे समोर आलं आहे.
पॉर्न फिल्म्स म्हणजेच पोर्नोग्राफीचा परिणाम तुमच्या शरीरावर तसंच डोक्यावर होताना दिसतो. चला तर मग आज पाहूया, पोर्नोग्राफीचा परिणाम तुमच्या डोक्यावर किंवा शरीरावर कसा होतो?
Neurosciencenews मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या रिसर्चप्रमाणे, पॉर्नचे न्यूरोलॉजिकल महत्त्व आता विज्ञानाला योग्य पद्धतीने समजलं आहे. संशोधनातून असं समोर आलं आहे की, पोर्नोग्राफीचा परिणाम खरोखर मेंदूवर पडतो.
मेंदूच्या एका क्षेत्राला रिवॉर्ड सेंटर असं म्हटलं जातं. यामधून आपल्या सवयी तयार होण्यास मदत होते. हा भाग आपल्या शरीरामध्ये डोपामाईन नावाचं रसायन सोडतो. यामुळे आपण करत असलेली कृती आणि त्यांची समज यांच्यामध्ये संबंध निर्माण होतो. उदाहरणार्थ, व्यायाम करणं, खाणं, लैंगिक संबंध इत्यादी.
त्यामुळे जेव्हा आपण पोर्नोग्राफी पाहतो तेव्हा, मेंदू वेगळ्या पद्धतीने प्रतिक्रिया देतो. हे एका क्रेविंगप्रमाणे असतं. मेंदूमध्ये एक बंद स्विच असतं जे क्रेविंग पूर्ण झाल्यावर डोपामाइन स्रवणं थांबवतं. याशिवाय पोर्नोग्राफीचा मेंदूवर एडिक्टेड औषधाप्रमाणेच परिणाम होतो. यामुळे डोपामाइनचं प्रमाण वाढतं.
या रिसर्चमध्ये असं सांगण्यात आलंय की, यामुळे मेंदूची निर्णय घेण्याची क्षमता कमी होऊ लागते.
पोर्नोग्राफीचे शरीरावर होणारे परिणाम
अधिक प्रमाणात पोर्नोग्राफी पाहिल्याने त्याचा परिणाम शरीरावर होता. हा परिणाम म्हणजे सेक्सुअल डिस्फंक्शन.
पोर्नोग्राफीमुळे तुमची एक वेगळ्या प्रकारची इच्छा निर्माण होऊ लागते. यावेळी तुम्ही पार्टनरकडून अपेक्षा ठेवता. परिणामी वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात.
जर तुम्ही सतत पोर्नोग्राफी पाहत असाल तर याचं रूपांतर एका व्यसनामध्ये होऊ शकतं. इतकंच नव्हे तर यामुळे तुमची नैसर्गिक भावना संपुष्टात येण्याची शक्यता अधिक असते.