नवी दिल्ली : अंडे किंवा चिकन हा आपल्यापैकी बहुतेकांचा आवडता आहार. पण, तुमच्या आहारात जर याचा नियमीत वापर होत असेल तर, वेळीच सावधान. अंडे किंवा चिकनचे अतिसेवन तुमच्या जीवावर बेतू शकते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्राप्त माहितीनुसार, उत्पादन वाढविण्याच्या नादात पोल्ट्री फार्म इंडस्ट्रीवाले मोठ्या प्रमाणावर अॅंटीबायोटिक्सचा वापर करत आहेत. ज्यामुळे पैदा होणाऱ्या कोंबड्या आणि त्यांची अंडीही अॅंटीबायोटिक रेसिस्टंट बॅक्टेरियायुक्त तयार होत आहेत. त्यामुळे अहार सेवनाच्या माध्यमातून या अॅंटीबायोटिक्सचा अंश लोकांच्या शरीरात जाण्याची शक्यता अधिक वाढली आहे. त्यामुळे भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) पोल्ट्री फर्म्सना सुचना दिल्या आहेत की, ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करा.


आजारांचा धोका


कमी कालावधीत जास्त उत्पादन आणि जास्त पैसा कमावण्याच्या अतिरेकापाई अमर्याद पद्धतीने औषधांचा वापर केला जात आहे. त्यामुळे अशा पद्धतीने वाढवल्या गेलेल्या कोंबड्यांमध्ये अॅंटीबायोटिक रेसिस्टंट बैक्टेरिया पैदा होतात. ज्यामुळे लोकांना निमोनिया सारखा अजार होऊ शकतो. तसेच, इतरही आजारांची लागण होऊ शकते. अशा वेळी डॉक्टरांकडून दिल्या जाणाऱ्या प्रचलीत औषधांना हे आजार दाद देत नाहीत. सेंटर फॉर सायन्स अॅण्ड एन्वायरमेंट अर्थातच सीएसईने केलेल्या संशोधनातही हे आढळून आले आहे. आजवर शेतात वापरल्या जाणाऱ्या खते आणि किटकनाशकांमधून लोकांच्या शरीरात विवीध बॅक्टेरीया जात असत. मात्र, आता चिकन आणि अंड्यांमधूनही त्या जात असल्याचे नव्याने पुढे आले आहे.