Eggs : अंड्यासोबत कधीच खाऊ नयेत या गोष्टी, होऊ शकते एलर्जी
आपण अंड्याचे अनेक प्रकार बनवतो. काही लोकांना एकट्याने अंड्यांचा आस्वाद घेणे आवडते, परंतु काही लोक मांस, दुधाचे पदार्थ आणि कॅफिनयुक्त पेयांसह अंडी खातात.
मुंबई : प्रथिने, जीवनसत्त्वे यांसारख्या अनेक घटकांनी समृद्ध असलेले अंडे (Eggs) आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते. शरीरासाठी ते खूप महत्वाचे आहे. म्हणूनच नाश्त्यामध्ये याचा समावेश करणे चांगले मानले जाते. यासोबतच आपण अंड्याचे अनेक प्रकार बनवतो. काही लोकांना एकट्याने अंड्यांचा आस्वाद घेणे आवडते, परंतु काही लोक मांस, दुधाचे पदार्थ आणि कॅफिनयुक्त पेयांसह अंडी खातात.
आयुर्वेदानुसार, चुकीचे अन्न संयोजन तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. तुमच्या पचनसंस्थेवर वाईट परिणाम होण्यासोबतच शरीराच्या इतर भागांवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. अंड्यांसोबत काय खाण्यास मनाई आहे ते जाणून घ्या.
अंडी आणि बेकन
अंडी आणि बेकन हे असेच एक संयोजन आहे. जे बहुतेक लोकांना खायला आवडते. तुम्हीही असे करत असाल तर सावधान. कारण या दोन्हीमध्ये प्रोटीन आणि फॅट जास्त प्रमाणात आढळतात, त्यामुळे तुमची एनर्जी लवकर संपते आणि तुम्हाला थकवा जाणवतो.
अंडी आणि साखर
साखरेशी संबंधित गोष्टी अंड्यासोबत खाऊ नयेत. कारण ते तुमच्यासाठी विषासारखे असू शकते. कारण दोन्हीमधून मिळणाऱ्या अमिनो अॅसिडमुळे शरीरात रक्ताच्या गुठळ्या तयार होऊ शकतात.
सोया दूध आणि अंडी
सोया मिल्कसोबत अंडी खाऊ नयेत. कारण दोन्हीमध्ये जास्त प्रमाणात प्रथिने आढळतात, ज्यामुळे तुम्ही सुस्त होऊ शकतात.
पर्सिमॉन फळ
खुर्मा हे फळ आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते. पण ते अंड्यांसोबत खाऊ नये. यामुळे तुम्हाला गॅस्ट्रिकचा त्रास होऊ शकतो.