अमेरिका : फार्मा कंपनी Pfizer ने अमेरिकेला 5 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी कोविड-19 लस मंजूर करण्यास सांगितलंय. ज्यामुळे अमेरिकेतील लहान मुलांसाठीही लसीकरण मार्चमध्ये सुरू होणार आहे. यावेळी, यूएस फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन (FDA) ने Pfizer आणि त्याचे भागीदार BioNtech यांना कार्यक्रमापूर्वी अर्ज करण्यास सांगितलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेत 5 वर्षाखालील 19 दशलक्ष मुलं आहेत ज्यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतलेली नाही. त्याचबरोबर अनेक पालक आपल्या मुलांना लसीकरण करून घेण्याचा आग्रह धरतायत. FDA ने मान्यता दिल्यास, Pfizer लस 6 महिन्यांपर्यंतच्या बालकांना कोरोना प्रतिबंधक दिली जाऊ शकते. 


फायझरच्या म्हणण्याप्रमाणे, कंपनीने अन्न आणि औषध प्रशासनाला माहिती देण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. या मुलांना किती डोस द्यावे लागतील हा एक मोठा प्रश्न आहे. 


सुरुवातीच्या चाचण्यांमध्ये, 2 डोस लहान मुलांसाठी पुरेसे मानले जात होते. मात्र त्यानंतर शाळांमध्ये प्रवेश घेतलेल्या मुलांसाठी ते पुरेसे दिसून आले नाहीत. फायझर तिसऱ्या डोसची चाचणी करत आहे.


अमेरिकेत लहान मुलांना ओमायक्रॉन व्हेरिएंटची लागण झाल्यानंतर एफडीएने फायझरला लसीबाबत अर्ज करण्यास सांगितलं होतं. 5 वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये ओमायक्रॉन प्रकारांची नोंद झाल्याचं एजंसीच्या प्रवक्त्यांकडून सांगण्यात आलं होतं. 


राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांचं सरकार मुलांसाठी अँटी-कोविड -19 लसीचे डोस मंजूर करण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचा प्रयत्न करतंय. या वयोगटातील शाळा पुन्हा सुरू करून त्या खुल्या ठेवण्यासाठी लसीकरण करणं अत्यंत आवश्यक आहे, असा त्यांचं म्हणणं आहे.