मुंबई : संपूर्ण आयुष्य काढण्यासाठी जोडीदार निवडीनं हे फार कठीण काम असतं. बऱ्याचदा मुलांना ही समस्या जास्त उद्भवते, कारण त्यांना मैत्रीण मिळाली तरी ती कधी काय विचार करेल हे मुलांना समजत नाही. मुलींना कशी मुलं आवडतात, त्याबद्दल त्या कधीच कोणाला सांगत नाहीत आणि मनात गुपित ठेवतात. त्यामुळे मुलांना नेहमीच असं वाटतं असतं की, त्यांना जर मुलींचं मन ओळखता आलं असतं, तर खूप बरं झालं असतं. जर मुलांना हे रहस्य माहित असेल, तर ते कोणत्याही मुलीशी चांगले बॉन्डिंग करू शकतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर आज आम्ही तुम्हाला काही रिसर्चच्या मदतीने समोर आलेल्या माहितीतून मुलींबद्दल काही गोष्टी जाणून घेण्यात मदत करणार आहोत.


1. अशी मुलं मुलींना आवडतात


असे म्हटले जाते की, मुलींना डोळ्यात डोळे घालून बोलणारी मुलं फार आवडतात. याचे कारण असे की, जे मुलं डोळ्यात बघून बोलतात त्यांच्यात जास्त आत्मविश्वास असतो. परंतु जर मुलगा इकडे तिकडे पाहून बोलत असेल तर, मुलींना हे जाणवतं की, मुलं माझ्यामध्ये इंट्रेस्टेड नाही. त्यामुळे मग मुली अशा मुलांना पुढे जाऊन भाव देखील देत नाहीत.


2. जजमेंटल मुलं आवडत नाहीत


मुलींना जजमेंटल मुले अजिबात आवडत नाहीत, ज्याची मुलांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. आजच्या काळात, मुलींनी हे करू नको, ते करू नको असं म्हणणारी मुलं आवडत नाहीत.  त्यामुळे असं कधीही तुम्ही मुलींसमोर बोलू नका.


3. मुलींना सरप्राईज आवडतात


मुलींना सरप्राईज खूप आवडतात. त्यामुळे जो मुलगा त्यांना जास्त गिफ्ट देईल त्यांच्याकडे मुली जास्त खेचल्या जातात. तुम्ही कोणत्याही मुलीला पाहिल्यांदा भेटायला जात असाल, तर तिला गिफ्ट घेऊन जा.


4. मजा-मस्ती करणारे मुलं आवडतात


मुलींना अशा मुलांशी मैत्री करायला आवडते. जी मुलं मजा-मस्ती करत आयुष्य जगत असतात. ज्याच्या चांगला सेन्स ऑफ ह्युमर चांगला असेल आणि तो कोणतीही गोष्ट जास्त सिरियस घेत नाही. त्यामुळे शक्यतो मुलींना तुमचे प्रॉबलम्स सांगू नका. तुम्ही जर त्यांना भेटल्यावर तुमच्या आयुष्यातील नेगेटीव्ह गोष्टींबद्दल बोलत राहिलात, तर मुली तुमच्याकडे दुर्लक्ष करतील.


5. रिस्पेक्ट देणारी मुलं आवडतात


मुलींना अशी मुलं आवडतात जी त्यांना रिस्पेक्ट देतील आणि कोणत्या ही गोष्टीसाठी त्यांचं मत विचारात घेतील. त्यामुळे मुलींशी नम्रतेनं बोला आणि कोणत्याही गोष्टीत त्यांना गृहीत धरु नका. नात्यात असताना मुलीचं मन नेहमी विचारात घ्या.


(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)