मुंबई : वाढणारा पोटाचा घेर हा कोणालाच नकोसा असतो. पोटाचा आकार कसा कमी होईल याकडे सर्वजण प्रयत्न करत असतात. पोटाच्या वाढत्या आकाराने ब्रिटनमधील 16 वर्षांची एक मुलगी देखील त्रस्त होती. एखाद्या गरोदर महिलेप्रमाणे तिच्या पोटाचा आकार वाढला होता. या समस्येमुळे जेव्हा ती डॉक्टरांकडे गेली त्यावेळी धक्कादायक कारण समोर आलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ब्रिटनमध्ये राहणारी 16 वर्षीय अबी चाडविक तिच्या वाढत असलेल्या पोटामुळे फार त्रस्त होती. पोटत वाढत असल्याने तिने डाएट तसंच वर्कआऊटचाही पर्याय वापरून पाहिला. मात्र त्याचाही काही फायदा झाला नाही. अखेर डॉक्टरांनी तपासणी केली असता तिच्या पोटामध्ये मोठ्या आकाराची गाठ (Cyst in Stomach) तयार झाल्याचं समोर आलं.


पोटात गाठ असल्याकारणाने तिचं पोट फुगलेलं दिसत होतं. यामुळे तिच्या पोटाभोवती ही चरबीही होती. एप्रिल 2021 मध्ये रुग्णालयात ऑपरेशन केल्यानंतर मुलीच्या पोटातून ही गाठ काढण्यात आली आहे.


अबीच्या म्हणण्याप्रमाणे, जेव्हा तिच्या पोटात गाठ होती, तेव्हा तिचं पोट दगडासारखं कडक झाले. जेव्हा ती घराबाहेर पडायची तेव्हा तिला लोकं 9 महिन्यांची गरोदर असल्याचं चिडवायचे. त्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की, तिच्या पोटात फुटबॉलच्या आकारऐवढी एक गाठ होती. 


सुरुवातीला डॉक्टरांनी पोटदुखीचा विचार करत किडनी स्टोन असल्याचा अंदाज बांधला होता. पण तपासानंतर असं आढळून आले की पोटात एक मोठी गाठ आहे. दरम्यान आता ही गाठ काढून टाकण्यात आली आहे.