मुंबई : आजकालच्या धावपळीच्या आणि तणावयुक्त जीवनशैलीमुळे शांत झोप लागणे तसे कठीणच. टी.व्ही., मोबाईलचे व्यसनही त्याला तितकेच कारणीभूत ठरते. तसंच शांत झोप न येण्यास तुमचा बेड अथवा तुमच्या बेडरुम मधील तापमान देखील तितकेच कारणीभूत असू शकते. त्यामुळे शांत झोपेसाठी या गोष्टींकडेही अवश्य लक्ष द्या.


चांगल्या आरामदायक बेडची निवड करा-


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर तुमचा बेड खूपच सॉफ्ट असेल तर तुम्हाला त्यापेक्षा थोड्या टणक बेडची गरज असू शकते. अल्ट्रा सॉफ्ट बेड कमी आरामदायक असतात. ज्यामुळे अंगदुखी व झोपमोड होत नाही. त्याचप्रमाणे तुमच्या मॅटट्रेसमध्ये देखील गुठळ्या नाहीत याची नीट दक्षता घ्या. निवांत झोप येण्यासाठी आरामदायक उशी घ्या. उशी जास्त मऊ अथवा जास्त टणक नसल्यास तुमच्या मानेला निश्चितच चांगला आधार मिळेल. तसेच उशीला नेहमी सुती कव्हर घाला.


बेडरुमचे तामपान योग्य व नियंत्रित ठेवा-


चांगल्या निवांत झोपेसाठी बेडरुमचे तापमान अतिथंड अथवा अतिउष्ण असे दोन्हीही नसावे. शांत झोपेसाठी आदर्श तापमान हे नेहमी ५० टक्के आद्रतेसह २५ अंश सेल्सियस असावे. त्यामुळे एकदा का बेडरुममधील वातावरण योग्य प्रमाणात उबदार झाले की तुमचे एसी अथवा हिटर बंद करा. कारण रात्रभर ते सुरु ठेवल्यास तुमच्या बेडरुम मधील आर्द्रता कमी होऊ शकते. ज्यामुळे तुम्हाला पुरेसे आरामदायक वाटणार नाही. एअरकंडीशनर वापरताना देखील हेच नियम पाळावेत.


रात्रीचे हलके जेवण घ्या-


तुम्ही रात्री काय खाता यापेक्षा तुम्ही किती वाजता जेवता हे खूप महत्वाचे आहे. झोपण्यापूर्वी दोन तास आधी जेवल्यामुळे तुमचे पचन चांगले होते व तुम्हाला झोप देखील चांगली लागते. तसेच तुम्ही रात्री हलका आहार घ्याल याकडे नीट लक्ष द्या. कारण जड जेवणामुळे तुम्हाला अपचन व पचनासंबधित इतर समस्या निर्माण होऊ शकतात.


दररोज ठराविक वेळीच झोपा-


लवकर निजे व लवकर उठे त्याला आरोग्य-संपदा लाभे असे पूर्वी सांगण्यात यायचे ते खरेच आहे. यासाठीच ठराविक वेळी झोपा व सकाळी लवकर उठा. तुमच्या झोपेच्या वेळेत बदल झाल्यामुळे देखील तुमच्या झोपेचा पॅटर्न बदलू शकतो. झोपेची वेळ पाळल्यामुळे तुमचे मन व शरीर दोघांनाही सात तास झोप घेण्याची शिस्त पाळण्यास मदत होते.


बेडरुममध्ये अंधार करा-


जसे रात्री जोरजोरात आवाजप्रमाणे प्रकाशामुळेही झोपमोड होऊ शकते. यासाठी रात्री झोपताना बेडरुममधील सर्व दिवे बंद करा. जर तुम्हाला रात्री वाचन करण्याची सवय असेल तर यासाठी एखादे पुस्तक वाचनासाठी घ्या कारण ई-बूकचा तुमच्या झोपेवर परिणाम होऊ शकतो.