मुंबई : सध्याच्या उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळावा म्हणून आपण थंड गार पाणी पितो. थंड पाणी प्यायल्याने काही वेळासाठी तुम्हाला बरं वाटतं. मात्र अतिप्रमाणात थंड पाणी प्यायल्याने तुमच्या शरीराला नुकसान होतंय. जाणून घेऊया अतिप्रमाणात थंड पाणी प्यायल्याने काय नुकसान होतं.


डोकेदुखी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जास्त थंड पाणी प्यायल्याने डोक्यावर परिणाम होत असल्याचं अनेक अभ्यासामधून दिसून आलं आहे. असं म्हणतात, थंड पाणी ब्रेन फ्रीज समस्या निर्माण करू शकतो. थंड पाणी पाठीच्या हाडांवर परिणाम करत आणि यामुळे नर्वस सिस्टिमवरही परिणाम होतो.


हार्ट रेट 


अनेक अहवालांमधून असं समोर आलं आहे की, जास्त प्रमाणात थंड पाण्याचं सेवन केल्याने हार्ट रेटवर परिणाम होतो. तज्ज्ञांच्या सांगण्याप्रमाणे, अति प्रमाणात थंड पाणी प्यायल्याने हार्ट रेट कमी होऊ लागतो. 


वजन कमी न होणं


ज्या व्यक्ती वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करतात त्यांनी शक्यतो थंड पाणी पिऊ नये. थंड पाणी प्यायल्याने फॅट बर्न होण्यामध्ये अडचण निर्माण होते. शरीरात असलेलं फॅट मजबूत करण्यास मदत करतं. त्यामुळे ते बर्न होऊ शकत नाही.


पचनक्रिया


जास्त प्रमाणात थंड पाणी प्यायल्याने पोटात अपचनाची समस्या निर्माण होऊ शकते. तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, थंड पाणी ज्यावेळी पोटात जातं त्यावेळी त्याचं तापमान समतोल राखू शकत नाही. यामुळे पचनक्रियेवर परिणाम होतो.