Glucoma Eye Disease Signs in Marathi: डोळा हा शरीरातील सर्वात महत्त्वाचा आणि मऊ भाग आहे. डोळ्यांशिवाय आपण आपल्या आयुष्याची कल्पना देखील करु शकत नाही. वाढत्या वयाच्या परिणाम आपल्या डोळ्यांवर दिसून येतो. तसेच ऑफीसमध्ये सतत कॅम्प्युटरच्या स्क्रीनवर काम, मोबाईलची स्क्रीन सतत पाहणे अश्या बऱ्याच कारणामुळे डोळ्यांवर ताण येऊ शकते. जर तुम्हाला डोळ्यासंबंधित कोणतीही समस्या जाणवल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या, नाहीतर तुम्हाला दृष्टीही गमवावी लागू शकते. आज तुम्हाला अशाच एका आजाराबाबत सांगणार आहोत. ज्यामध्ये लक्षणे समजत नाहीत पण कायमचे अंधत्वही येऊ शकते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ग्लूकोमा हा डोळ्यांचा आजार असून याला काचबिंदू असं ही म्हणतात. डोळ्यांच्या ऑप्टिकल नर्व्हला नुकसान होते,  ज्यामुळे कायमस्वरुपी दृष्टीही जाऊ शकते. देशात काचबिंदूच्या रुग्णांत वाढ झाली असून काचबिंदूची समस्या तरुणांमध्ये अधिक सामान्यपणे दिसून येत असल्याचे संशोधनातून पुढे आले आहे. काचबिंदूमुळे अंधत्व येते. विशेषत: तरुण, प्रौढांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे, असे अभ्यास करणाऱ्या डॉक्टरांचे म्हणणे आहे.


काचबिंदू म्हणजे काय?


काचबिंदू हा डोळ्यांचा आजार असून ऑप्टिक नर्व्हला नुकसान करते. ऑप्टिक मज्जातंतू डोळ्याच्या मागच्या बाजूला असते आणि ती डोळ्यातून मेंदूला व्हिज्युअल सिग्नल प्रसारित करते आणि व्हिज्युअलायझेशनमध्ये मदत करते. ऑप्टिक नर्व्हला झालेल्या नुकसानामुळे अंधत्व येऊ शकते. काचबिंदूमध्ये, ऑप्टिक मज्जातंतूवर विलक्षण उच्च दाबामुळे नुकसान होते. ऑप्टिक मज्जातंतूच्या या नुकसानामुळे शेवटी अंधत्व येण्याची जास्त शक्यता असते.  काचबिंदू हे प्रौढांमधील अंधत्वाचे प्रमुख कारण असल्याचेही म्हटले जाते. काचबिंदूच्या काही प्रकारांमध्ये, रुग्णाला कोणतीही लक्षणे आढळून येत नाहीत. प्रभाव इतका स्थिर असतो की जोपर्यंत स्थिती गंभीर होत नाही तोपर्यंत ते लक्षात येत नाही.


दरवर्षी मार्चमध्ये जागतिक काचबिंदू सप्ताह साजरा केला जातो कारण काचबिंदू लवकर ओळखणे आणि उपचार करणे याविषयी जागरूकता हे महत्त्वाचे कारण आहे. विविध स्वतंत्र अभ्यास, अहवाल आणि रुग्णालयांच्या आकडेवारीनुसार, काचबिंदूशी संबंधित अंधत्व जागरूकतेच्या अभावामुळे आणि त्याचा शोध घेण्यात उशीर झाल्यामुळे वाढत आहे. भारतात सुमारे 90 टक्के वेळा हा आजार आढळून येत नाही, असे दिसून आले आहे. जीवनशैलीच्या आजारांप्रमाणेच, नेत्ररोग तज्ज्ञांना काचबिंदूची वाढ दिसत आहे. ज्याला ‘सायलेंट थिफ’ असेही म्हणतात. डोळ्याच्या इतर आजारांप्रमाणे, काचबिंदू हा उशिरा अवस्थेपर्यंत लक्षणे नसलेला असतो आणि तोपर्यंत तो दृष्टीचे नुकसान करतो. वेळीच उपचार न केल्यास अंधत्व येऊ शकते. काचबिंदू भारतातील 40 आणि त्याहून अधिक वयाच्या सुमारे 11.2 दशलक्ष लोकांना प्रभावित केले आहे. काचबिंदू हे आपल्या देशात अंधत्वाचे तिसरे सामान्य कारण असल्याचे सांगितले जाते. हा आजार पारंपरिकपणे वृद्धत्वाशी संबंधित असला तरी, तरुण व्यक्तींनादेखील याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे वेळीच सावध होणे फार गरजेचे आहे.