मुंबई : डोळे हा आपल्या शरीरातील अत्यंत नाजूक व महत्त्वाचा भाग. आजकाल अनेकांचे काम हे कॅम्प्युटर, लॅपटॉपसमोर बसून होत असते. त्यानंतर मग मोबाईल स्क्रिनवर डोळे लावून आपण बसतो. त्यामुळे डोळ्यांच्या आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात. पण या समस्या आरोग्याच्या काही संकेत देत असतात. तर जाणून घेऊया आपले डोळे आपल्या आरोग्याबद्दल काय सांगतात....


डोळ्यांखालील काळी वर्तुळे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तणाव, प्रदूषण किंवा थकवा यामुळे डोळ्यांखालील काळी वर्तुळे येतात. यासाठी उत्तम उपाय म्हणजे डोळ्यांना आराम द्या. भरपूर झोप घ्या आणि तणावापासून दूर रहा.


डोळ्यांखाली सूज येणे


डोळ्यांखाली सूज येणे किंवा आयबॅग हा धोकादायक आजारांचा संकेत आहे. अनेकदा पोषकघटकांच्या कमतरतेमुळे आयबॅग तयार होते. मात्र ही समस्या खूप काळापासून रहात असल्यास किडनी, ओव्हरी किंवा गर्भाशयाला इन्फेक्शन झाल्याचा इशारा आहे. यामुळे याकडे गंभीरपणे लक्ष द्या.


लालरस डोळे


डोळे लाल होणे हा डोळ्यांच्या एलर्जीचा संकेत आहे. उन्ह, धुळीचे कण, धूर यामुळे एलर्जी होऊ शकते. यासाठी उन्हात बाहेर पडताना उत्तम प्रतीचा गॉगल घालावा. त्याचबरोबर टोपीचा वापरही तुम्ही करु शकता.


लहान डोळे


डोळे सामान्य आकारापेक्षा लहान दिसत असल्यास किंवा हलकेसे पिवळसर दिसत असल्यास डोळ्यांना ताबडतोब आराम द्या. हा व्हायरलचा संकेत आहे.


पिवळसर डोळे


डोळ्यांचा पिवळेपणा हा कावीळचा संकेत आहे. अल्कोहोलच्या अधिक सेवनाने पोटातील उष्णता वाढल्यास ती अशाप्रकारे डोळ्यांच्या माध्यमातून प्रकट होते.


घ्या डॉक्टरांचा सल्ला


डोळे आरोग्याचा संकेत देतात. पण त्यावर घरगुती उपचार करण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. लिव्हर, किडनीसंबंधित आजारांचे संकेत डोळे देत असल्यास त्याकडे अजिबात दुर्लक्ष करु नका.