नवी दिल्ली : सोशल मीडियावर रोज काही मेसेज फिरत असतात. आपण त्याची सत्यता न पडताळता विश्वास ठेवला जातो किंवा त्या पोस्ट व्हायरल केल्या जातात. असाच एक मेसेज सध्या व्हायरल होत आहे. घट्ट कपडे घातल्यामुळे पुरूषांना नपुंसकत्व येत असल्याचं या मेसेजमध्ये म्हटलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मेजेसमागचं सत्य काय हे झी 24 तासनं पडताळलं आहे. नेमकं सत्य काय आहे आणि  पुरूषांना खरंच नपुंसकत्व येतं का? पाहा काय आलंय झी 24 तासच्या व्हायरल सत्य काय आहे. हल्ली टाईट जिन्स घालणं ही फॅशन झाली आहे. अनेक तरुण हे कायम घट्ट कपड्यांमध्येच वावरत असल्याचं दिसतं. मात्र असे कपडे तुमच्या आरोग्यावर अपाय करतायत का? यासंबंधीचा एक मेसेज सध्या व्हायरल होतो आहे.



काय म्हटलंय रिसर्चमध्ये?


अमेरिकेमध्ये मेल इनफर्टिलिटी रिसर्च करण्यात आला. त्यात घट्ट कपडे घातल्यानं फर्टिलिटीवर परिणाम होत असल्याचं समोर आलं आहे. वंध्यत्वाची समस्या असलेल्या पुरूषांचा सर्वेक्षणात समावेश होता. त्यांची दिनचर्या, खाण्यापिण्याच्या सवयी, झोपेचा पॅटर्न, सिगारेट, दारूचं व्यसन याचा अभ्यासात समावेश होता. 


यामध्ये घट्ट कपड्यांऐवजी सैल कपडे घालणा-या पुरूषांमध्ये स्पर्म काऊंट 17 टक्के जास्त आढळून आल्याचं या व्हायरल मेसेजमध्ये म्हटलं आहे. आता हा मेसेज व्हायरल झाल्यानंतर झी २४ तासनं या मेसेजचं सत्य शोधून काढण्याचा प्रयत्न केला. अमेरिकेत खरोखरच असं संशोधन झाल्याचं आमच्या तपासात समोर आलं. 


काय व्हायरल मेसेज मागचं सत्य?


हार्वर्ड टी एच यान स्कूल ऑफ पब्लिक हेल्थनं हा अभ्यास केला. मात्र यात घाबरण्यासारखं काही नसल्याचंही स्पष्ट झालं. डॉक्टरांच्या मते घट्ट कपडे घालणा-या पुरूषांना घाबरण्यासारखं काहीच नाही. घट्ट कपड्यांमुळे स्पर्म काऊंट कमी होतो हे खरं आहे. मात्र 3 महिने ढगळ कपडे घातल्यानंतर त्यात पुन्हा सुधारणा होऊ शकते. 


त्यामुळे झी २४ तासच्या तपासात व्हायरल मेसेज हा अर्धसत्य असल्याचं आढळून आलं आहे. घट्ट कपड्यांचा परिणाम होतो हे खरं असलं तरी तो परिणाम कायमस्वरुपी नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे तुम्हाला टाईट कपड्यांची आवड असेल, तर आधूनमधून ते वापरायला काहीच हरकत नाही.