रुचा वझे, मुंबई : फेअरनेस क्रिम लावत नाही अशी तरुणी किंवा तरुण सापडणे विरळच झाले आहे. फेअरनेस क्रिममुळे तुम्ही गोरे होता की नाही हे माहिती नाही पण त्यामुळे होणाऱ्या तोट्यांची यादी खूप मोठी आहे. काय आहेत फेअरनेस क्रिमचे तोटे किती आहेत, हा स्पेशल रिपोर्ट.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जिच्या पर्समध्ये फेअरनेस क्रिम सापडणार नाही अशी एखादीच तरुणी सापडेल. भारतात तर गोरेपणासाठी फेअरनेस क्रिम लावणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पण गोरेपणाचा दावा करणाऱ्या या क्रिम धोकादायक असल्याचं खळबळजनक माहिती समोर आलीय. गोरेपणाचा दावा करणाऱ्या या क्रिममध्ये पाऱ्यासारख्या धातूचा वापर अतिप्रमाणात केला जातो. त्यामुळं साध्या क्रिमचा वापर करतानाही तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे जेजे रुग्णालयातील त्वचारोगतज्ज्ञ डॉ. महेंद्र कुरा सांगतात.


हे आहेत दुष्परिणाम


 फेअरनेस क्रिमच्या दुष्परिणामांची यादी मोठी आहे. त्वचेवर पुरळ येऊ शकतात, शिवाय चट्टेही येण्याची शक्यता असते. क्रिमच्या अतिवापरामुळे किडनी खराब होऊ शकते. फुप्फुसांवरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. पाचनशक्ती मंदावते. कधी कधी तर डिप्रेशनही येण्याची शक्यता असते. लहान मुले आणि वयोवृद्धांनी फेअरनेस क्रिम वापरुच नये, असे सांगितलं जातं.
 
लाव क्रिम आणि हो गोरी असा गैरसमज भारतीय महिलांमध्ये आहे. आक्रमक जाहिरातींमुळे आपण या सापळ्यात आणखीनच अडकतो. तुम्ही या क्रिम लावून गोरे होणार नाही. पण या क्रिम लावून तुमचं अंगभूत सौंदर्य तुम्ही गमावू शकता.